food

गळा आणि मानेची त्वचा गोरी करण्यासाठी 6 घरगुती उपाय

सर्वांनाच गोरी त्वचा पाहिजे असते त्यासाठी ते आपल्या चेहऱ्यावर थोडे जास्तच लक्ष देतात. आपला चेहरा गोरा करण्यासाठी विविध प्रोडक्ट्स वापरतात यासर्व प्रयत्नांना यश देखील येते परंतु चेहरा गोरा झाला तरी गळा आणि मान काळी राहते ज्यामुळे त्यांच्या सुंदरतेमध्ये काहीतरी कमी असल्याचे जाणवते. आज आपण येथे गळा आणि  मान गोरी करण्यासाठी कोणते उपाय करता येतात ते पाहू.

गळा आणि मानेची त्वचा गोरी करण्यासाठी घरगुती उपाय

एलोवेरा

जर तुम्हाला गळा आणि मानेची त्वचा गोरी करायची असेल तर त्यासाठी एलोवेरा जेल फायदेशीर ठरेल. यासाठी तुम्हाला रात्री झोपण्याच्या अगोदर 5 मिनिट एलोवेरा जेलने मसाज करायचा आहे असे आठवड्यातून दोन वेळा करा. असे केल्याने एका महिन्यात मानेचा आणि गळ्याचा काळेपणा दूर होईल.

बटाटा

मानेचा काळेपणा दूर करण्यासाठी बटाटे हे एक नैसर्गिक ब्लीच म्हणून काम करते. तुम्ही तुमच्या मानेच्या आणि गळ्याच्या त्वचेला स्वच्छ करण्यासाठी बटाटे वापरू शकता. तुम्ही दररोज रात्री झोपण्या अगोदर बटाटा कापून मानेवर 10 मिनिट मसाज करावा त्यानंतर त्वचा धुवून घ्यावी यामुळे काळेपणा दूर होईल.

बेसन

जर तुम्हाला काळेपणा पासून सुटका मिळवायची असेल तर बेसन मध्ये अर्धा चमचा राईचे तेल आणि चिमुटभर हळद एकत्र करून पेस्ट तयार करा आता ही पेस्ट आपल्या काळ्या मानेवर आणि गळ्यावर कमीतकमी 15 मिनिट लावून ठेवा. यानंतर थोडे रगडावे आणि पाण्याने धुवून घ्यावे.

बेकिंग सोडा

बेकिंग सोडा वापरून तुम्ही आपली काळी मान आणि गळा गोरी करू शकता. यासाठी तुम्ही अर्धा चमचा बेकिंग सोडा घ्या त्यामध्ये एक चमचा गुलाबजल मिक्स करा. आता यानंतर ही पेस्ट आपल्या त्वचेवर लावून मसाज करा काही दिवसातच मान आणि गळा गोरा होईल.

विटामिन ई ऑइल

विटामिन ई मध्ये रंग उजळवण्याचे नैसर्गिक गुण असतात जर तुम्ही आपल्या काळ्या मानेला गोरे बनवू इच्छित असाल तर विटामिन ई च्या तीन कैप्सूल घ्या आणि यातील ऑईलने मानेवर मसाज करा काही दिवसातच मान गोरी होईल.

लिंबू आणि मध

लिंबूरस आणि मध मिक्स करून रात्री झोपण्याच्या अगोदर मानेवर लावा आणि सकाळी थंड पाण्याने मान धुवून घ्या. काही दिवसातच फरक दिसायला लागेल.


Show More

Related Articles

Back to top button