Marathi Jokes : जेव्हा आजोबा डॉक्टरकडे जातात…

Marathi Jokes : अरे वा !!! कमाल आहे या चष्म्याची.

बाई : डॉक्टरसाहेब, तुम्ही माझं वजन कमी व्हावं म्हणून
दिलेल्या ह्या गोळ्या मी दिवसातून किती वेळा घ्यायच्या?

डॉक्टर : ५० वेळा.

बाई : (घाबरून) ५० वेळा ? अहो, वेड-बिड लागलंय की काय तुम्हाला? तुम्ही डॉक्टरच आहात ना?

डॉक्टर : खायच्या नाही हो. ह्या गोळ्या तुम्ही फक्त ५० वेळा जमिनीवर टाकायच्या
आणि उचलायच्या, झीरो फिगरसाठी हेच करावं लागतं.


एक आजोबा डॉक्टरकडे जातात.
त्यांना दिसायचं कमी झाल्याने त्यांना डोळे तपासायचे असतात.

डॉक्टर डोळे तपासतात आणि त्यांना नवीन चष्मा देतात.

आजोबा: डॉक्टर, ह्या चष्म्याने मला पुर्णपणे स्पष्ट दिसेल ना?

डॉक्टर: हो, हो, नक्कीच. अगदी रोज सकाळी पेपरही तुम्हाला वाचता येईल.

आजोबा: अरे वा !!! कमाल आहे या चष्म्याची.
मी अडाणी भोपळा, तरीही यातून पाहिल्यावर मला आपोआप वाचता येईल म्हणजे…वा, वा, वा !!!

Marathi Jokes: New viral doctor jokes in marathi very funny marathi jokes

Follow us on

Sharing Is Caring: