astrology

देवी लक्ष्मीची कृपा होण्यासाठी मुख्य दरवाजा वर ठेवा या 6 वस्तू, होतील सर्व मनोकामना पूर्ण

आज दिवाळीचा मुख्य दिवस आहे. आज लक्ष्मी पूजन आहे. या दिवसाची आपण सर्व लोक वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतो. आज हिंदू धर्मीय लोकांसाठी महत्वाचा दिवस आहे. विशेष करून लहान मुलांना आजच्या दिवसाची फार उत्सुक्ता असते. कारण आजचे घरातील वातावरण वेगळे असते सर्व कडे रोषणाई, मिठाईचा सुगंध, नवीन कपडे आणि फटाके इत्यादी.

दिवाळीचा हा सन भगवान राम 14 वर्षाच्या वनवासा नंतर पुन्हा अयोध्या मध्ये आल्याच्या आनंदात साजरा केला जातो. या सणाला चांगल्याचा वाईटा वरील विजय मानला जातो. असुरांचा राजा रावण याला मारून प्रभू श्रीरामाने सर्वांना वाईटा पासून वाचवले होते.

हिंदू धर्मात अशी मान्यता आहे की आजच्या दिवशी घरामध्ये साफसफाई ठेवल्यामुळे देवी लक्ष्मी घरात प्रवेश करतात. या दिवशी लोक साफसफाई करतात आणि संपूर्ण घराला सजवतात. वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाजाला विशेष महत्व आहे. यासाठी देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी मुख्य दरवाजाला विशेष लक्ष देऊन साफसफाई केली जाते आणि सजवले जाते. वास्तूशास्त्रानुसार घर-दुकानाच्या मेन गेट समोर या 6 वस्तू ठेवल्या तर माता लक्ष्मीची विशेष कृपा होते. घर-परिवारात सुख-समृद्धी टिकून राहते आणि पैश्यांची कमतरता कधी होत नाही. तर पाहूयात कोणत्या या 6 वस्तू आहेत ज्या घराच्या मुख्य दरवाजा (मेन गेट) वर ठेवायला पाहिजेत.

दुकान आणि घराच्या मुख्य दरवाजा वर ठेवा या 6 वस्तू

दिवाळीच्या दिवशी (लक्ष्मी पूजन) एका भांड्यात पाणी भरून त्यामध्ये काही फुले ठेवून त्यास घर किंवा ऑफिसच्या मेन गेट जवळ ठेवा. लक्षात ठेवा फुल आणि पाण्याने भरलेल्या या भांड्यास दरवाजाच्या पूर्व किंवा उत्तर दिशेस ठेवा. असे केल्यामुळे कुटुंब प्रमुखास अत्यंत लाभ होतो.

देवी लक्ष्मीची कृपा होण्यासाठी दिवाळीच्या दिवशी घर आणि दुकानाच्या मुख्य दरवाजा वर ॐ चे चिन्ह काढा किंवा शुभ-लाभ लिहा. लक्षात ठेवा हे तुम्हाला मेन गेट च्या पूर्व किंवा उत्तर दिशेलाच बनवायचे आहे. असे केल्यामुळे कोणताही आजार जास्त वेळ तुमच्या घरामध्ये टिकणार नाही.

दिवाळीच्या दिवशी घर आणि दुकानाच्या मेन गेट वर माता लक्ष्मीचे चित्र लावले पाहिजे हे चित्र देवी कमळाच्या फुला मध्ये बसलेली आहे असे दाखवणारे असावे. हा उपाय घर-परिवाराला अनेक शुभ फळ देतात.

दिवाळीच्या दिवशी मुख्य दरवाजावर रंगेबीरंगी तोरण लावणे शुभ मानले जाते. जर तुम्ही आंब्याच्या पानांचे, पिंपळाच्या किंवा अशोक च्या पानांचे तोरण बांधले तर ते अजून जास्त शुभ असते. जर तोरण या वस्तुचे बनले असेल तर वास्तू मध्ये नकारात्मक उर्जेचा प्रवेश होत नाही.

दिवाळीच्या दिवशी घर आणि दुकानाच्या मुख्य दरवाजावर चांदीचे स्वस्तिक लावा. वास्तूशास्त्रा अनुसार असे केल्यामुळे घरामध्ये आजारपण प्रवेश करत नाही. जर चांदीचे स्वस्तिक लावणे शक्य नसेल तर कुंकवाने स्वस्तिक काढावे.

दिवाळीच्या दिवशी घर आणि दुकानाच्या मुख्य दरवाजा वर देवी लक्ष्मीच्या पाऊलाचे चिन्ह लावणे अत्यंत शुभ असते. लक्षात ठेवा चिन्ह लावताना पाउलांची दिशा आत मध्ये येणारी असावी म्हणजेच लक्ष्मी माता घरात प्रवेश करत असल्या सारखे भासवणाऱ्या पद्धतीने लावावीत. असे केल्यामुळे घरात धन-धान्याची कधी कमतरता होत नाही.

हे पण वाचा : दिवाळीच्या रात्री दिसले हे 4 जीव तर समजा तुमच्या घरात माता लक्ष्मी चे आगमन झाले आहे, पहा कोणते आहेत ते जीव

Show More

Related Articles

Back to top button