Uncategorized

अशी आहे नंबर 1 ऑलराऊंडर शाकिबची लव्ह स्टोरी, पत्नीसाठी केली होती बिजनेसमैनला भर मैदानात मारहाण

बांगलादेशचा क्रिकेटर शाकिब अल हसन आयसीसी रैनकिंग मध्ये नंबर एकचा ऑलराऊंडर आहे आणि तो नंबर एकचा क्रिकेट ऑलराऊंडर का आहे हे त्याने वेस्ट इंडिज सोबतच्या मैच मधून दाखवून दिले आहेच. पण आज आम्ही तुम्हाला तो किती चांगला क्रिकेटर आहे हे सांगणार नाही आहोत तर त्याच्या आयुष्यतील लव्ह स्टोरी बद्दल सांगणार आहोत कारण शाकिब अल हसन याची लव्ह स्टोरी एखाद्या बॉलिवूड फिल्म प्रमाणे मनोरंजक आहे.

शाकिबच्या पत्नीचे नाव उम्मी अहमद शिशिर आहे. उम्मी हि दिसण्यास अत्यंत सुंदर आहे आणि ती आपल्या सुंदरतेमुळे नेहमीच चर्चेत असते. कमी लोकांना माहीत असेल कि इंग्लंड मध्ये आपल्या फलंदाजीने धुमाकूळ घालणाऱ्या शाकिबच्या लव्ह स्टोरीची सुरुवात देखील येथूनच झाली होती.

शाकिब अल हसनची पत्नी चर्चेत तेव्हा आली होती जेव्हा वर्ष 2014 मध्ये भारत-बांग्लादेश मैच दरम्यान एका बिजनेसमैनच्या मुलाने तिच्या सोबत गैरवर्तन केले होते. भारता विरुद्ध 15 जून रोजी मिरपूरच्या नेशनल क्रिकेट स्टेडियमच्या गैलरी मध्ये मैच दरम्यान शाकिबची पत्नी उम्मी अहमद शिशिर सोबत कथितपणे यौन उत्पिडन झाले होते.

जेव्हा शाकिबला या बद्दल समजले तेव्हा तो त्वरित आपल्या बॉडीगार्ड्स सोबत घटना स्थळी पोहचला. येथे त्याने एक युवक रहमान (बिजनेसमैन) याची जोरदार धुलाई केली होती ज्याने त्याच्या पत्नी सोबत गैरवर्तन केले होते. यानंतर युवकाला अटक करण्यात आले. उम्मी अहमद शिशिर एक बांग्लादेशी-अमेरिकन आहे. 10 वर्षांची असताना उम्मीचे आई वडील अमेरिकेला शिफ्ट झाले होते. शाकिब आणि उम्मी यांचे लव्ह मैरेज झाले आहे. दोघांच्या लव्ह स्टोरीची सुरुवात इंग्लंड मधून झाली होती.

काउंटी क्रिकेट खेळत असताना 2010 मध्ये पहिल्यांदा इंग्लंड मध्ये उम्मी आणि शाकिब यांची ओळख झाली होती. उम्मी इंग्लंडला सुट्टी मध्ये आली होती आणि दोघेही एकाच हॉटेल मध्ये होते. येथेच दोघांची ओळख झाली आणि त्यानंतर मैत्री आणि हळूहळू मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.

एकमेकांना दोन वर्ष डेट केल्या नंतर त्यांनी 12 डिसेंबर 2012 रोजी विवाह केला. उम्मी पाच भाऊ आणि एक बहीण यामध्ये सगळ्यात लहान आहे. आयपीएल मैच दरम्यान देखील उम्मी अनेक वेळा शाकिबला चीयर करताना दिसली होती. उम्मीला ट्रॅव्हलिंगची हौस आहे. तिला पार्टी करणे देखील चांगले वाटते.

उम्मीची लाईफस्टाइल एखाद्या मॉडेल किंवा अभिनेत्री पेक्षा कमी नाही आहे. तिने अमेरिकेच्या मिनेसोटा युनिव्हर्सिटी मधून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. उम्मी इंजिनियरिंग मध्ये ग्रॅज्युएट आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button