Breaking News

Raju shrivastav death news: राजू श्रीवास्तव यांचे दुःखद निधन, दिल्ली येथे घेतला अखेरचा श्वास

Raju shrivastav death news: राजू श्रीवास्तव (Raju shrivastav)यांचे दिल्लीच्या एम्स हॉस्पिटल मध्ये निधन झाले आहे. राजू श्रीवास्तव यांनी वयाच्या 59 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

राजू श्रीवास्तव हे प्रसिद्ध कॉमेडी स्टार होते. स्टँडअप कॉमेडीचे राजू हे बादशहा होते. त्यांनी प्रेक्षकांना खळखळवून हसवले.

याच सोबत राजू श्रीवास्तव यांनी बॉलीवूड मध्ये देखील काही फिल्म मध्ये काम केले होते. मागील काही महिन्यापासून राजू श्रीवास्तव यांच्यावर दिल्ली येथील एम्स हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु होते.

त्यांना हार्ट अटैकचा झटका आल्या नंतर त्यांच्यावर उपचार सुरु होते परंतु उपचाराला पुरेसा प्रतिसाद मिळाला नाही आणि अखेर त्यातच त्यांचे निधन झाल्याची बातमी समोर आली आहे.

About Amit Velekar

आपल्यासाठी सर्वोत्तम माहिती घेऊन येण्याचा आमचा प्रयत्न असतो. जर आमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल तर आपण आम्हाला फेसबुकवर फॉलो करू शकता.