KBC 11 मध्ये 7 करोड रुपयांसाठी विचारला गेला क्रिकेट संबंधित असा प्रश्न, युजर म्हणाला- ‘सचिनला देखील नसेल माहीत उत्तर’

‘कौन बनेगा करोडपती 11’ मध्ये आयएएसची तयारी करणारे सनोज राज पहिला करोडपती झाले आहेत. अमिताभ बच्चन यांच्या समोर हॉट सीट वर बसलेले सनोज सुरुवातील खूप नर्वस होते पण 15 प्रश्नांची बरोबर उत्तर देण्यास त्यांना यश मिळाले. पण 7 करोडच्या प्रश्नाला ते अडथळले आणि त्यांनी शो सोडण्याचा निर्णय घेतला.

जैकपॉटसाठी अमिताभ बच्चन यांनी सनोजला ठणकावून सांगितले कि जर त्याला बरोबर उत्तर माहीत असेल तरच पुढे खेळ. सनोजला 7 करोडसाठी जो प्रश्न विचारला गेला त्या बद्दल आता ट्विटर वर मजेशीर रिएक्शन येत आहेत.

बिग बी अमिताभ यांनी सनोजला 7 करोड रुपयांसाठी 16 वा प्रश्न विचारला. 16वा प्रश्न होता- ‘ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज सर डॉन ब्रैडमैन यांनी कोणत्या भारतीय गोलंदाजाच्या बॉलिंग वर एक रन बनवून प्रथम श्रेणी मधील शंभरावे शतक पूर्ण केलं होत?’ शो सोडण्याच्या निर्णयानंतर जेव्हा अमिताभ यांनी सनोजला आपला अंदाज लावण्यासाठी सांगितलं तेव्हा त्याने ‘कोमांदुर रंगाचारी’ हे उत्तर दिले. पण या प्रश्नाचे बरोबर उत्तर ‘गोगुमल किशन चंद’ हे होते.

एका ट्विटर युजर ने क्रिकेट कॉमेंट्रेटर हर्षा भोगले यांना टैग करत लिहिलं ‘सर, तुम्हाला याचे उत्तर माहीत आहे का?’

या कठीण प्रश्नाबद्दल एक युजर लिहितो- ‘मला वाटते कि क्रिकेटचे देव समजल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकर यांना देखील या 7 करोडच्या प्रश्नाच उत्तर माहीत नसेल. सनोज तुम्ही चांगले खेळले.’

तर एक युजर म्हणतो- ‘7 करोडसाठी असा प्रश्न…’

खरंच 7 करोडसाठी क्रिकेट बद्दल प्रश्न आल्यामुळे कोणताही सामान्य क्रिकेट चाहता आनंदीतच होईल पण जेव्हा प्रश्न काय आहे हे जेव्हा त्याला समजेल तेव्हा त्याला देखील आपल्या क्रिकेट बद्दलच्या ज्ञानाची जाणीव होईल हेच खरं. काय बरोबर आहे ना. तुम्हाला काय वाटत तुम्हाला हा प्रश्न विचारला असता तर तुम्ही 7 करोड जिंकले असते का?