celebrities

कैटरीनाच्या आयुष्यातील हे गुपिते माहित नसतील तुम्हाला, या व्यक्तीवर होते जीवापाड प्रेम

बॉलीवूडची आघाडीची नायिका कैटरीना कैफच्या सौंदर्याचे चाहते तर अगणित आहेत. तिच्या बद्दल प्रत्येक अपडेट माहित करून घेण्यात फैन नेहमी उत्सुक असतात. कैटरीना कैफचे चाहते तिला वेगवेगळ्या सोशल प्लेटफार्म वर तिला फॉलो करतात. तसे पाहता कैटरीनाला तिच्या सुरुवातीच्या काळा मध्ये प्रेक्षकांनी विशेष पसंत केले नव्हते पण तिच्या सौंदर्याची चर्चा मात्र सगळीकडे झाली. एवढेच नाही तर बॉलीवूडचा दबंग सलमान खान देखील कैटरीनाच्या रूपाने घायाळ झाला. सलमान आणि कैटरीना यांच्या लिंकअप्सच्या बातम्या नेहमी येत होत्या, असे बोलले जाते कि कैटरीनाची चर्चा तिच्या कामाची कमी आणि सलमान सोबत लिंकअप्समुळे जास्त झाली.

कैटरीना आपली पर्सनल लाइफ प्राइवेट ठेवते पण तिच्या अफेयर्सच्या बातम्या मिडीया पर्यंत येतात. पण कैटरीनाच्या लाइफ मध्ये अश्या काही गोष्टी आहेत ज्यांच्या बद्दल कदाचित तुम्हाला माहिती नसेल. चला पाहू कोणत्या आहेत त्यागोष्टी ज्या सगळ्यांना माहित नाहीत नाही.

कैटरीना कैफची भारता मध्ये कोणतीही संपत्ती नाही आहे

कैटरीना कैफ आज बॉलीवूड मधील आघाडीची नायिका आहे परंतु तरीही तिची स्वताची भारतामध्ये कोणतीही प्रोपर्टी नाही. कैटरीना आज देखील मुंबई मधील बांद्रा मध्ये भाडयाच्या फ्लैट मध्ये राहते. पण तिने इंग्लैंड मध्ये काही संपत्ती खरेदी केली आहे.

बुद्धिबळ खेळण्याची शौकीन

एक्टिंग कैटरीनाचे पैशन असले तरी आपल्या फ्री टाईम मध्ये वेगवेगळ्या हॉबीस ती फॉलो करते यामध्ये बुद्धिबळ आवडता खेळ आहे. बुध्दिबळ फक्त आवडतो असे नाही तर ती एक उत्तम खेळाडू देखील आहे. तुम्ही कैटरीना कैफला ब्युटी विद ब्रेन बोलू शकता.

सगळ्यात जास्त सर्च होणारी बॉलीवूड सेलेब्रिटी

आपल्या ब्रेकअप्स आणि रिलेशनशिपमुळे न्यूज मध्ये राहणारी कैटरीना कैफ एक अशी नायिका आहे जीला बॉलीवूड मध्ये सगळ्यात जास्त सर्च होणारी सेलेब्रिटी असल्याचा मान मिळाला आहे. साल 2011 आणि 2012 मध्ये कैटरीनाला गुगल मध्ये सगळ्यात जास्त सर्च केले गेले होते. साल 2011 मध्ये कैटरीनाला सोशल मिडियावर सगळ्यात जास्त सर्च होणारी सेलेब्रिटीचा मान मिळाला होता.

समाजसेवी देखील आहे कैटरीना

ग्लैमरस असण्या सोबतच कैटरीनाचे व्यक्तित्व साधेसरळ आहे, ती आपल्या कमाई केलेल्या उत्पन्नाचा काही भाग आपल्या आईच्या चैरीटिबल ट्रस्ट ड रिलीफ प्रोजेक्ट्स मध्ये देते, तुमच्या माहितीसाठी हा ट्रस्ट इंडिया मध्ये देखील कार्य करते, जो भारतातील कन्या भ्रूंणहत्या थांबवण्यासाठी कार्य करते.

सलमान खान पहिले खरे प्रेम

कैटरीना कैफच्या अफेयरच्या बातम्या अनेक व्यक्तींसोबत आली पण तिचे नाव सगळ्यात जास्त वेळ सलमान खान जोडले गेले आणि सलमान खानच्या सोबत असलेल्या अफेयरच्या बातम्यामुळे ती प्रसिद्धी झोतात आली. सलमान आणि कैटरीना कैफ यांच्या ब्रेकअप होऊन बराच काळ निघून गेलेला आहे पण कैटरीना कैफ ने साल 2011 मध्ये दिलेल्या एका इंटरव्यू मध्ये सांगितले होते कि सलमान खान तिचे पहिले प्रेम होते.

Related Articles

Back to top button