18 व्या वर्षी केलेल्या पापाची शिक्षा भोगत आहेत काटयांवर झोपणारे बाबा

युपी मध्ये प्रयागराज मध्ये कुंभ-2019 मोठ्या उत्साहात केला गेला. कुंभ मेळ्यात हजारो लाखो लोक सामील झाले होते.देश-विदेशातून अनेक लोक येथे स्नान करण्यासाठी आले होते. असेच एक बाबा म्हणजे साधू येथे आले होते त्यांच्या बद्दल आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत. हे साधू आपल्या पापाची शिक्षा म्हणून काट्यांवर झोपलेले दिसून आले. आता हे कोणत्या पापाची शिक्षा स्वताला देत आहेत हे आपण पुढे जाणून घेऊ.

साधू या पापाची शिक्षा भोगत आहे

आम्ही ज्या साधू बद्दल बोलत आहोत त्यांच्या बद्दल जाणून घेतल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल कारण असे मानले जाते कि ईश्वराच्या भक्ती मध्ये शक्ती असते आणि काही भक्त हे वेळोवेळी सिद्ध करून दाखवत असतात. या कुंभ मध्ये काटयांवर झोपलेले साधू महाराज सगळ्यांचे लक्ष आकर्षित करत होते. हे बाबा काट्यांच्या बिछान्यावर झोपले होते जे पाहून प्रत्येकाला आश्चर्य आणि कुतूहल वाटत होते.

हे काट्या वाले बाबा नेहमी असे काटयांवर विराजमान का असतात यामागे एक गोष्ट आहे. खरंतर झालं असं कि 18 वर्षाचे असताना त्यांच्या सोबत एक घटना घडली ज्याची शिक्षा ते आज देखील भोगत आहेत. असे सांगितलं जाते कि कुंभ मध्ये हे काट्यांवाले बाबा अनेक वर्षा पासून आपल्या पापाचे प्रायश्चित्य करत आहेत. या बद्दल बाबांनी सांगितलं होत कि जेव्हा ते 18 वर्षाचे होते तेव्हा त्यांनी चुकून गौ हत्या केली होती आणि ज्यानंतर त्यांना दुःख झाले.

बाबांनी सांगितलं कि माघ मेळ्यात आणि कुंभ मध्ये प्रयागराज मध्ये येतात त्या दरम्यान जे धन त्यांना दान म्हणून मिळते ते बाबा मथुरा मधील गायीच्या देखभालीसाठी वापरतात. या बाबांच्या अनुसार देशामध्ये जेथे मोठे धार्मिक आयोजन होते तेथे ते आपल्या काटयांचा बिछाना अंथरतात.

या काट्यावाल्या बाबांचे नाव लक्ष्मण राम आहे. बाबा लक्ष्मण यांचे म्हणणे आहे कि काट्यांवर झोपल्यामुळे त्यांना कोणतीही वेदना होते ज्यास ते सहन करतात. आपण देखील अनेक वेळा सोशल मीडियावर त्यांचे फोटो पाहिले असतील आणि लाईक शेयर देखील केले असेल.