Connect with us

लाख प्रयत्ना नंतर देखील मुलाला सुसाइड करण्या पासून थांबवण्यात अपयश आले

Celebrities

लाख प्रयत्ना नंतर देखील मुलाला सुसाइड करण्या पासून थांबवण्यात अपयश आले

बॉलीवूड मधील अभिनेता कबीर बेदी आपल्या पर्सनल लाईफमुळे नेहमीच चर्चे मध्ये असतो. त्यांनी चार लग्न केलेले आहेत. चौथी बायको त्याची मुलगी पूजा बेदीच्या वयाची आहे. त्यांनी आता पर्यंत आपले आयुष्य बिनधास्त पणे जगले आहे. परंतु आजही एक गोष्टीचे त्यांना दुखः आहे ते आहे 25 वर्षाचा मुलगा सिद्धार्थचा मृत्यू. ज्यास अनेक प्रयत्न करून देखील आत्महत्या करण्या पासून ते वाचवू शकले नाहीत. या बद्दल कबीर बेदीने फ्री प्रेस जर्नलमध्ये दिलेल्या एका इंटरव्यू मध्ये सांगितले. कबीर म्हणाले ‘सुसाइड जब आपके परिवार में या फिर आस-पास कोई करता है तो दर्द का अहसास होता है। आमतौर पर लोग इस दर्द को अपने अंदर दबाकर रखना चाहते हैं लेकिन मेरा मानना है कि चुप रहना किसी दर्द का सॉल्यूशन नहीं होता है’ तुमच्या माहितीसाठी सिध्दार्थ याने 1997 मध्ये सुसाइड केले होते. सिध्दार्थ हा कबीर आणि त्यांची पहिली पत्नी प्रोतिमा बेदी यांचा मुलगा होता.

इंटरव्यू मध्ये कबीर बेदी म्हणाले माझ्या मुलाने इन्फोर्मेशन टेक्नोलॉजी मध्ये ऑनर्स केले होते. त्यानंतर तो मास्टर डिग्रीच्या शिक्षणासाठी नॉर्थ कैलिफोर्न‍ियाच्या युनिव्हर्सिटी मध्ये गेला. तेथे सर्व काही बदलले.

मास्टर्सच्या शिक्षणा दरम्यान समजले कि सिद्धार्थ डिप्रेशन मध्ये आहे. ते वाढतच गेले आणि शेवटी ते सिजोफ्रेनिया सारख्या गंभीर आजारामध्ये परावर्तीत झाले. त्यांनी सांगितले, आम्ही त्याच्या उपचाराला सुरुवात केली होती. त्या दरम्यान मुलगा जे औषधे घेत होता ते त्याला उदासी कडे घेऊन जात होती.

दररोज त्याला सकारात्मक करण्याचा प्रयत्न केला पण हळूहळू तो डिप्रेशन मध्ये गेला. त्याने स्वता आपल्या आजार पणा बद्दल इंटरनेटवर सर्च केले, जेथे त्याला आजारपणाचे गंभीर परिणाम दिसले. एक दिवस त्याने मला सांगितले कि तो सुसाइड करण्याचा विचार करत आहे. मी त्याला भरपूर समजावले पण तो समजू शकला नाही.

कबीर बेदी यांनी पुढे सांगितले एक दिवस मी त्याचा इमेल वाचला, जो त्याने आपल्या मित्राला केला होता. त्यामध्ये त्याने लिहिले होते कि मित्राने त्याला फेयरवेल देण्यासाठी यावे. मला हा मेल वाचल्या नंतर धक्का बसला. आणि काही दिवसा नंतर त्याने सुसाइड केला. त्याने एक पत्र सोडले होते, ज्यामध्ये लिहिले होते ‘मी दुसरीकडे जात आहे’

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top