health

नस वर नस चढणे किंवा मांसपेशी अखडणे यावर रामबाण घरगुती उपाय, जाणून घ्या आणि शेयर करा

आपले शरीर अनेक प्रकारच्या मांसपेशी आणि हाडांच्या पासून तयार झालेले आहे. निरोगी शरीरासाठी हाडांचे मजबूत असणे आवश्यक आहे. अनेक वेळा असे होते कि आपल्या शरीरातील एखाद्या भागाची नस चढते ज्यामुळे आपल्याला भरपूर त्रास होतो. हि समस्या बहुतेक वेळा पायांमध्ये किंवा हातामध्ये होते.

नस वर नस चढणे हि एक सामान्य समस्या आहे पण जेव्हा हि समस्या होते तेव्हा होणारा त्रास असह्य असतो.

नस वर नस चढण्याची कारणे

दोन ते पाच मिनिटे पायाची नस अखडणे आणि तीव्र वेदना होते. रात्री झोपताना अनेक लोकांना पायाची नस चढण्याची समस्या होते आणि असह्य वेदना होतात.

पायाची नस चढण्याचे कारण

डायरिया, डाईयूरेटिक, डाइबिटीज, डीहाइड्रेशन, एल्कोहोलचे अतिरिक्त सेवन, जास्त थकवा, बीपीच्या गोळ्या किंवा गर्भनिरोधक गोळ्या खाणे इत्यादी.

नस वर नस चढण्याचे काही घरगुती उपाय

आपल्या शरीराच्या उंचीला अर्ध्या अर्ध्या भागात चिन्हित करा, आता ज्या भागात नस चढली आहे त्याच्या विरुध्द भागाच्या कानाच्या खालच्या सांध्यावर (जोडावर) बोटाने हळूच दाबून हळूहळू वर आणि खाली करा. असे 10 सेकंद करा यामुळे नस उतरून जाईल.

झोपताना पाया खाली जाड उशी ठेवा.

आराम करताना पाय उंचावर राहतील अशी व्यवस्था करा.

समस्या असलेल्या जागी बर्फाचा थंड शेक द्यावा. हा शेक 15 मिनिट दिवसातून 3-4 वेळा करावा.

जर गरम आणि थंड शेक तीन ते पाच मिनिट (दोन्ही एकामागून एक) केल्यामुळे ही समस्या आणि वेदना दोन्ही दूर होतील.

जर तुम्हाला मधुमेह किंवा उच्च रक्तदाबाची समस्या असेल तर आपले पथ्य आणि उपचार व्यवस्थित पाळावीत.

मद्य, तंबाखू, सिगारेट, नशेच्या वस्तू पासून दूर राहावे.

योग्य मापाचे आरामदायक बूट वापरावीत.

आपले वजन कमी करावे. रोज चालण्याचा व्यायाम करा. यामुळे पायांच्या नसा मजबूत होतील.

फाइबर युक्त भोजन करावे जसे चपाती, ब्राऊन ब्रेड, भाज्या आणि फळे. मैदा आणि पास्ता सारख्या वस्तू पासून दूर राहावे.

आहार काय घ्यावा

लिंबूपाणी, नारळ पाणी, मोसंबी, डाळिंब, सफरचंद, पपई, केळी इत्यादी सेवन करावे. भाज्यांमध्ये पालक, टमाटर, सलाड, गाजर, बटाटे इत्यादी सेवन करावे. 2-3 अक्रोड, 2-5 पिस्ता, 5-10 बदाम, 5-10 किशमिश यांचा आहारामध्ये समावेश करावा.


Show More

Related Articles

Back to top button