People

1500 चा नाही 6 हजार रुपयांचा पडेल जियो फोन, या आहेत लपलेल्या गोष्टी

संपूर्ण देशात 60 लाख लोकांनी जियो फोनची बुकिंग केली आहे, यानंतर कंपनीने समोर आणल्या आहेत त्यांच्या अटी आणि शर्ती, ज्या अजून पर्यंत तुम्हाला माहीत नाहीत. जियो फोन तुम्हाला 1500 रुपयांना नाहीतर 6 हजार रुपयांना पडेल. आम्ही तुम्हाला सांगत आहोत कंपनीच्या काही अश्या लपलेल्या अटी बद्दल ज्या आता समोर आल्या आहेत.

कम्पलसरी रिचार्ज

जियो फोनच्या लोन्चिंग आणि बुकिंगच्या वेळेस कंपनीने हे नाही सांगितले की युजर्सना प्रत्येक महिन्याला रिचार्ज करणे कम्पलसरी आहे. वर्षभरात तुम्हाला 1500 रुपयांचा रिचार्ज करावाच लागेल.

1500 रुपयांच्या हिशोबाने तीन वर्षांची रक्कम 4500 रुपये होते. बुकिंग अमाउंट म्हणून कंपनीने तुमच्या कडून 1500 रुपये अगोदरच घेतले गेले आहे त्यामुळे एकूण सर्व मिळून ही रक्कम 6000 रुपये होईल. म्हणजेच 6 हजार रुपये तुम्हाला खर्च करावे लागतील.

ही पोस्ट आपल्या मित्रांच्या सोबत शेअर करून त्यांनाही हा फोन घेण्याच्या अगोदर सावध करा.


Show More

Related Articles

Back to top button