Connect with us

घर आणि गाडी सोबतच तयार होईल 40 लाख रुपयांचा फंड, एक्सपर्ट्सची फेवरेट आहे ही स्ट्रैटजी

Money

घर आणि गाडी सोबतच तयार होईल 40 लाख रुपयांचा फंड, एक्सपर्ट्सची फेवरेट आहे ही स्ट्रैटजी

प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते कि आयुष्यात त्याच्याकडे घर-गाडी आणि रिटायरमेंटच्या वेळी चांगले पैसे असावेत. परंतु मिडल क्लास लोकांना हे सोप्पे नसते. पण जर गुंतवणूक योग्य प्लानिंगने केली तर हे सोप्पे केले जाऊ शकते. जर तुम्हाला वाटते कि हे सर्व तुमच्याकडे असावे आणि आर्थिक बोझ पण होऊ नये तर फैनेनशियल एक्स्पर्टची सर्वात आवडती स्कीमचा तुम्ही फायदा उठवला पाहिजे. एक्स्पर्ट या स्कीम्सना इनक्रीजिंग इन्वेस्टमेंट बोलतात.

असे काम करते हि स्कीम

यामध्ये थोडे पैसे गुंतवून तुम्ही सुरुवात करू शकता नंतर हळूहळू वाढवू शकता. या स्कीममुळे तुम्ही ठरवलेले लक्ष मिळवू शकता. जर तुम्ही 25 व्या वर्षी नोकरी सुरु करत असाल तर 30 च्या वयात कार, 45 मध्ये घर आणि 60 च्या वयात आपली रिटायरमेंट लाईफ घालवण्यासाठी आवश्यक पैसे हवेत. एक्स्पर्टच्या अनुसार जेवढ्या लवकर बचत आणि गुंतवणूक सुरु केले जाईल तेवढ्या सहजतेने आपले ध्येय गाठता येते.

असे ठरावा आर्थिक ध्येय

  • 5 वर्षा नंतर 5 लाख रुपये कार घेण्यासाठी
  • 20 वर्षा नंतर 40 लाख रुपये घर घेण्यासाठी
  • रिटायरमेंटसाठी 40 लाख रुपये

सुरु करावी लागेल 5 हजार रुपयेची इनक्रीजिंग इन्वेस्टमेंट

जर तुम्हाला वाटत असेल कि वरील ध्येय हे तुमचे आर्थिक ध्येय आहेत तर तुम्हाला 5 हजार रुपयांचे इनक्रीजिंग इन्वेस्टमेंट सुरु करावे लागेल. या सुरुवातीने तुम्ही आपले हे आर्थिक ध्येय ठरवलेल्या वेळेत साध्य करू शकता.

दर वर्षी वाढवा बचत

दर वर्षी बचत वाढवण्याच्या योजनेस इनक्रीजिंग इन्वेस्टमेंट म्हणतात. जर तुम्हाला वरील आर्थिक ध्येय गाठायची असतील तर 5 हजार रुपये गुंतवणूक सुरु करावी लागेल. यामध्ये दरवर्षी 10 टक्के वाढ करावी. म्हणजेच पहिल्या वर्षी दर महिन्याला 5 हजार गुंतवणूक आणि पुढील वर्षी दर महिन्याला 5500 रुपये गुंतवणूक. अश्या पद्धतीने गुंतवणूक दरवर्षी वाढत जाईल. लोकांची दर वर्षी सैलरी वाढते त्यामुळे त्यांना बचत करण्यास काही त्रास होणार नाही.

कार घेण्यासाठी सुरु करा गुंतवणूक

सुरुवातीला कार घेण्यासाठी गुंतवणूक करा. 5 हजार रुपये महिना गुंतवणूक सुरु करा. यामध्ये दर वर्षी 10 टक्के वाढ करा. अश्या गुंतवणुकीवर 12 टक्के रिटर्न मिळतो तुमच्याकडे 5 वर्षात 5 लाख रुपये होतील. यामध्ये तुम्ही तुमची आवडती कार घेऊ शकता.

नंतर घर घेण्यासाठी सुरु करा गुंतवणूक

घर घेण्यासाठी फंड तयार करण्याच्या दोन योजने पैकी एक तुम्ही निवडू शकता. पहिल्या योजनेत तुम्ही कार घेण्यासाठीची योजना संपल्या नंतर नव्याने 5 हजार रुपये गुंतवणूक करण्याची योजना सुरु करू शकता. नंतर यामध्ये 10 टक्के वाढ करावी. असे केल्याने तुमच्याकडे पुढील 15 वर्षात 43 लाख रुपयांचा फंड जमा होईल. या पैश्यातून तुम्ही 40 लाख रुपया पर्यंतचे घर खरेदी करू शकता आणि उरलेले 3 लाख रुपये रजिस्ट्रेशन आणि इतर खर्चासाठी वापरू शकता.

दुसऱ्या योजने मध्ये तयार होऊ शकतो जास्त फंड

जर तुम्ही दुसरी योजना निवडली तर तुमच्याकडे घर खरेदी करण्यासाठी जास्त पैसे जमा होऊ शकतात. कार खरेदी करण्यासाठी 5 वर्षाची गुंतवणूक केली होती. 5 व्या वर्षी तुमची दर महिन्याची गुंतवणूक 7320 रुपये झालेली होती. जर तुम्ही याच अकाऊंट मधून गुंतवणूक सुरु केली आणि यामध्ये दर वर्षी 10 टक्के वाढ केली तर 63.5 लाख रुपये फंड तयार होईल. या योजनेतून तुम्ही जास्त मोठे आणि शानदार घर खरेदी करू शकाल.

यानंतर तयार करा रिटायरमेंटसाठी फंड

या दोन योजना पूर्ण होई पर्यंत तुमच्यावर मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी आलेली असेल. त्यामुळे तुमच्या जवळ गुंतवणुकीसाठी दर महिन्यात जास्त पैसे वाचणार नाहीत. यासाठी तुम्ही 5 हजार रुपया पासून सुरुवात करा आणि यामध्ये दर महिन्याला 10 टक्के वाढ करा. पुढील 15 वर्षानंतर जेव्हा तुम्ही 60 वर्षाचे व्हाल तेव्हा तुमच्याकडे 43 लाख रुपये पेक्षा जास्त फंड असेल. महिन्याच्या हिशोबाने तुम्हाला 40 हजार रुपये उत्पन्न होऊ शकते.

कुठे मिळू शकतो एवढा रिटर्न

इक्विटी म्युचुअल फंड ने दिला आहे चांगला रिटर्न

शेयरखानच्या वाईस प्रेसिडेंट अनुसार चांगल्या रिटर्नसाठी इक्विटी म्युचुअल फंड चांगला विकल्प आहे. येथे मागील वर्षी अनेक योजनांनी 50 टक्के रिटर्न दिला आहे. परंतु दर वर्षी एवढ्या चांगल्या रिटर्न मिळण्याची अपेक्षा ठेवणे योग्य राहणार नाही, पण मोठ्या अवधीच्या गुंतवणुकीवर 12 टक्के पर्यंत रिटर्न आरामात मिळवला जाऊ शकतो.

चांगले रिटर्न देणारे टॉप 5 इक्विटी फंड स्‍कीम्‍स

स्‍कीम 1 वर्षाचा रिटर्न (% मध्ये)
Tata Digital India Fund – Regular Plan 54.69
Aditya Birla Sun Life Digital India Fund 43.44
ICICI Prudential Technology Fund  41.31
SBI Technology Opportunities Fund 40.48
Motilal Oswal NASDAQ 100 Exchange Traded Fund 34.45
Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top