Breaking News
Home / करमणूक / जर आपल्याला त्रास आणि अशांतता यापासून वाचायचे असेल तर हे 4 रत्न आपल्या जवळ पाहिजेत

जर आपल्याला त्रास आणि अशांतता यापासून वाचायचे असेल तर हे 4 रत्न आपल्या जवळ पाहिजेत

एका लोककथेनुसार प्राचीन काळात आपल्या बुद्धिमत्तेमुळे गावात एक म्हातारा माणूस खूप प्रसिद्ध झाला होता. त्याला एक मुलगा होता. गावातील लोक त्यांच्याकडे स्वत: च्या समस्या घेऊन येत असत आणि म्हातारा त्यांना समस्यांचे योग्य निराकरण सांगायचा.

एक दिवस त्या वृद्ध माणसाला त्याची शेवटची वेळ जवळ आली आहे असे वाटले म्हणून त्याने मुलाला जवळ बोलावले आणि म्हणाले की, मी तुम्हाला चार रत्ने देऊ इच्छितो, ही रत्ने तुम्हाला त्रासांपासून वाचवतील आणि तुमचे मन शांत ठेवतील. मुलगा म्हणाला, ठीक आहे, मला हे रत्न द्या.

वडील आपल्या मुलाला म्हणाले पहिले रत्न आहे माफी म्हणजेच क्षमा. घर-परिवार आणि समाजामध्ये कोणीही काहीही म्हणाले तरीही तू कधीही कोणाच्याही वाईट गोष्टींकडे लक्ष दिले नाही पाहिजे. कधीही कोणाच्याही बद्दल बदला घेण्याची भावना मनात ठेवू नकोस. चुकांबद्दल लोकांना क्षमा कर. हे कुटुंबातील सर्वाना समजावून सांग.

वडील म्हणाले माझे दुसरे रत्न आहे वाईट गोष्टींना आणि आपण केलेल्या चांगल्या कामांना, मदतीला विसरून जावे. जेव्हाही दुसऱ्याचे भले करशील, मदत करशील तर ते लक्षात ठेवू नको. अश्याच प्रकारे ज्या वाईट गोष्टी आहेत ज्या दुःख देतात, त्यांना देखील विसरून जावे.

माझे तिसरे रत्न आहे परमेश्वरावर कायम विश्वास ठेवणे. कोणत्याही कामामध्ये यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम कर आणि परमेश्वराच्या सोबतच स्वतःवर देखील विश्वास ठेव.

चवथे रत्न आहे वैराग्य भावना. लक्षात ठेव कि ज्याने जन्म घेतला आहे, त्याचा मृत्यू अटळ असतो. कोणताही व्यक्ती मृत्यू नंतर आपल्या सोबत काहीही घेऊन जाऊ शकत नाही. त्यामुळे कोणत्याही वस्तूचा किंवा सुख-सुविधाचा मोह करू नये. नेहमी वैराग्य भावना कायम ठेवली पाहिजे.

आपणास वरील लोककथा आवडली असेल तर यापैकी कोणते रत्न तुमच्या जवळ आहे हे कमेंट मध्ये आवश्य लिहा. पोस्ट आवडली असेल तर लाईक आणि शेयर करा ज्यामुळे इतरांना देखील लाभ मिळेल.

About V Amit