या देशात भारताचा 1 रु आहे 350 रु एवढा, या 6 देशात भारतीय रुपयाला आहे मोठी किंमत, पैस्यांची काळजी नाही भरपूर मजा करा

0
41

भारतीय चलन म्हणजेच रुपया बद्दल आपल्याला नेहमीच एक तक्रार असते कि आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत अत्यंत कमी आहे. ज्यामुळे आपण आपल्या आवडीच्या ठिकाणी परदेशात जाण्या अगोदर अनेक वेळा विचार करतो. पण जर आपण इतिहासामध्ये पाहिले तर 1947 मध्ये भारताच्या 1 रुपयाची किंमत 1 डॉलर एवढी होती. पण आज आपण पाहिले तर 1 डॉलरची किंमत 70 भारतीय रुपयांच्या पेक्षा जास्त आहे. म्हणजेच आपण 70 रुपये दिल्या नंतर एक डॉलर मिळतो. त्यामुळे बहुतेक भारतीय परदेशात जाण्याच्या अगोदर विचार करतात.

पण असे असले तरी देखील अजूनही काही देश असे आहेत जेथे भारतीय रुपयाला किंमत आहे. जर आपण देखील बाहेर परदेशात फिरायला आणि मौजमस्ती करायला जाण्याचा विचार करत असाल तर आपण या सुंदर देशांच्या सफरी जाऊ शकता. जेथे तुम्हाला भारतीय रुपया आपण श्रीमंत असल्याचा अनुभव देतील. चला पाहू कोणकोणते आहेत असे देश.

इंडोनेशिया : या देशात भारतीय एक रुपया तेथील 197.66 रुपये होतात. या देशात जेथे स्वच्छ निळे पाणी आणि उष्णकटिबंधीय वातावरण आहे. इंडोनेशिया अश्या काही देशांपैकी आहे जेथे भारतीय रुपयांची व्हैल्यू जास्त आहे. एवढंच नाही तर भारतीयांना मोफत वीजा दिला जातो. याचा अर्थ आपण कमी खर्चात या सुंदर देशामध्ये फिरण्यास जाऊ शकतो.

व्हिएतनाम : व्हिएतनाम मध्ये भारतीय एक रुपया त्यांच्या 326.51 डोंग एवढा आहे. व्हिएतनाम देश बौद्ध पगोडा, अप्रतिम व्हिएतनामी पदार्थ आणि नदी यासाठी प्रसिद्ध आहे. व्हिएतनाम भारतीयांना फिरण्यासाठी एकदम योग्य ठिकाण आहे कारण येथील संस्कृती पूर्णतः वेगळी आहे. हे जास्त दूर नाही आहे आणि जास्त महागडे देखील नाही आहे. युद्ध संग्राहालय तसेच फ्रेंच वास्तुकला हे व्हिएतनामच्या आकर्षणाचे केंद्र आहे.

कंबोडिया : कंबोडिया मध्ये भारतीय एक रुपया 57.35 कंबोडियन रियाल एवढे आहेत. कंबोडिया मोठ्या दगडाने बनलेल्या अंगकोर वाट मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. भारतीय लोक येथे जास्त पैसे खर्च न करता जास्त फिरू शकतात. येथील रॉयल पैलेस, राष्ट्रीय संग्रहालय आणि पुरातात्विक वास्तू आकर्षणाचे केंद्र आहेत. कंबोडिया पश्चिमी राष्ट्रांमध्ये पर्यटनासाठी लोकप्रिय आहे आणि याची लोकप्रियता आता भारतामध्ये देखील वाढत आहे.

श्रीलंका : आपला शेजारी असलेला श्रीलंका भारतीय एक रुपया श्रीलंकेच्या 2.55 रुपया एवढा आहे. सुंदर समुद्र किनारा, हिरवळ, ऐतिहासिक स्मारके हे श्रीलंकेतील आकर्षणाचे केंद्र आहेत. भारतीयांमध्ये उन्हाळ्याची सुट्टी मधील सगळ्यात लोकप्रिय ठिकाण म्हणून श्रीलंकेला पसंती असते. हा देश भारताच्या अगदी जवळ आहे आणि स्वस्त विमान प्रवास यामुळे येथे जाणे भारतीयांना आवडते.

नेपाळ : भारताचा 1 रुपया नेपाळचा 1.60 रुपये होतात. येथे आपल्याला काही आश्चर्यजनक गोष्टी पाहण्यास मिळतील. नेपाळ मध्ये माउंट एव्हरेस्ट आणि सात इतर उंच पर्वत आहेत. जे पर्यटकांचे आकर्षण करतात. भारतीय लोकांसाठी अजून एक खुशखबर ही आहे कि नेपाळ मध्ये जाण्यासाठी भारतीयांना वीजा आवश्यक नाही.

आईसलैंड :  हा देश जगातील सगळ्यात सुंदर ठिकाणा पैकी एक आहे. उन्हाळ्या पासून वाचण्यासाठी आपण या देशाचा दौरा केला पाहिजे. आईसलैंड झरे, ग्लेशियर आणि काळ्या रेतीचा समुद्र किनारा यासाठी प्रसिद्ध आहे. येथे भारतीय एक रुपयाची किंमत 1.74 क्रोणा एवढी आहे.