ICC चा एक निर्णय आणि तब्बल 30 क्रिकेटपटूंची कारकीर्द धोक्यात, जाणून घ्या अधिक माहिती

हल्लीच ICC ने एक मोठा निर्णय घेतला आहे ज्यामुळे तब्बल 30 क्रिकेटपटूंची कारकीर्द जवळपास संपली आहे. कारण ICC च्या या निर्णयामुळे झिम्बाम्बे क्रिकेटवर मोठे संकट आले आहे. आयसीसी ने झिम्बाम्बे सरकार तिथल्या क्रिकेट बोर्डामध्ये ढवळाढवळ करतो त्याबद्दल झिम्बाम्बेवर निलंबनाची कारवाई केली आहे त्यामुळे झिम्बाम्बेच्या क्रिकेटपटूंचे करिअर जवळपास संपले आहे. कारण जर झिम्बाम्बेचा संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट या निर्णयामुळे अधिकृतरीत्या खेळू शकणार नसल्याने झिम्बाम्बेच्या क्रिकेटपटूंना राष्ट्रीय संघासाठी खेळाता येणार नाही.

आयसीसीच्या या निर्णयामुळे झिम्बाम्बेचा क्रिकेट संघ निराश झाला आहे आणि आयसीसीकडून पुनर्विचार होऊन काही सकारात्मक निर्णय होईल अशी आशा बाळगून आहे. झिम्बाम्बे क्रिकेट संघाचा उपकर्णधार पीटर मूर याने सांगितले कि या निर्णयामुळे आम्हा सर्वाना मोठा धक्का बसला आहे. आमच्या मते आयसीसीने झिम्बाम्बे क्रिकेटला एक संधी देण्याची आवश्यकता आहे.

पीटर मूर पुढे म्हणाला कि लहानपणापासून झिम्बाम्बेसाठी खेळण्याचे स्वप्न होते पण आता कोणी तरी आपल्या पायाखालची जमीन काढली असल्याची भावना होत आहे. मी हल्लीच वरिष्ठ संघात स्थान मिळवण्यास सुरुवात केली आहे आणि त्यानंतर आलेला हा निर्णय म्हणजे माझ्यासाठी या पेक्षा वाईट वेळ असू शकत नाही.

आयसीसी ने झिम्बाम्बे क्रिकेट बोर्डावर निलंबनाची कारवाई केल्यावर टीम मधील खेळाडू सोलोमन मायरनं इंटरनेशनल क्रिकेट मधून रिटायरमेंट घेत असल्याची घोषणा केली. पीटर मूर याने 2014 मध्ये आपल्या एकदिवसीय क्रिकेट कारकीर्द बांगलादेश विरुद्ध केली होती. तेव्हा पासून आता पर्यंत 8 कसोटी आणि 49 एकदिवसीय सामने तसेच 19 टी 20 मैच खेळला आहे. सोलोमनने कसोटी मध्ये 533 रन एकदिवसीय क्रिकेट मध्ये 827 तर आपल्या 19 टी 20 मध्ये 251 रन केल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here