moneyPeople

असली लेदर कसं ओळखावं… काही सिंपल ट्रिक्सने तुम्ही सुद्धा टाळू शकता फसवणूक

लेदरच्या वस्तू ओळखणं तसं कठिण काम आहे. या वस्तू महाग असतात पण या टिकावू असल्यानं एकदाच खर्च करावा लागतो. खरं लेदर ओळखण्यासाठी ही काही टिप्स आहेत. आणि त्या टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

कसं ओळखावं खरं लेदर ?

सर्वप्रथम लेदरच्या वस्तूला आग लावा. उत्तम दर्जाच्या लेदरवर आगीचा कोणताही परिणाम होत नाही. दुसरीकडे खोटे किंवा पेंटेड लेदर आगीमुळे आक्रसते. आगीशी संपर्क झाल्यास खर्‍या लेदरच्या आकारावर आणि टेक्स्चरवर कोणताही परिणाम होत नाही. लेदरचे उत्पादन खरेदी करताना सोबत लाइटर बाळगा. लेदरच्या उत्पादनावर लाइटर फिरवून ते खरे असल्याची खात्री करून घ्या. अनेकदा खरं लेदर आहे याची ओळख करून देण्यासाठी दुकानदार स्वतः लायटरने त्याची ओळख पटवून देतो.

लेदरला तुम्ही पिननं छिद्र पाडू शकता. जर लेदर खरं असेल तर त्याला तुम्हाला छिद्र पाडता येणार नाही. शिवाय तुम्ही जिथं छिद्र पाडता त्याचा निशाण देखील काही वेळातच मिटून जाते. जर डुप्लिकेट असेल तर त्या छिद्राचं निशाण तिथंच राहते.

ख-या लेदर मध्ये आपल्या शरीरावर असतात तसे छिद्र असतात. जर लेदर प्लेन असेल तर समजायचं की ते लेदर डुप्लिकेट आहे.

खरं लेदर हे नकली लेदरपेक्षा मऊ असते. तसंच ते एकसारखं नसते. काही ठिकाणी ते जाड तर काही ठिकाणी ते पातळ असते. शिवाय त्याच्या खरपूसपणाही कमी अधिक प्रमाणात असतो.

लेदरला विशिष्ट प्रकारचा वास असतो. या वासाची कॉपी करणे तंत्रज्ञानालाही शक्य झालेले नाही. त्यामुळे लेदरचा वास जाणून घेऊन उत्पादन खरेदी करताना नाकाचा प्रभावी वापर करा.

ख-या लेदरला शायनिंग कमी असते. तसंच त्याची फिनिशिंग ही डुप्लिकेट लेदरच्या तुलनेत थोडी कमी असते. जर लेदरला शायनिंग जास्त असल्यास समजून घ्यावे की हे लेदर डुप्लिकेट आहे.

लेदर ओळखण्याची महत्त्वाची खूण म्हणजे लेदर उत्पादनाच्या कडेची बाजू. लेदर उत्पादनाच्या कडेची बाजू काहीशी खरखरीत असते. लेदर कठीण असताना आकार दिल्याने कडा खरखरीत राहतात. लेदर खोटे असेल तर कडेची बाजू गुळगुळीत लागते.

लेदरच्या वस्तू थोड्या ओढून बघा. खर्‍या लेदरचे टेक्स्चर कधीही एकसारखे नसते


Show More

Related Articles

Back to top button