Connect with us

शरीरावरचा लालसर पणा दूर करण्याचे घरगुती उपाय

Health

शरीरावरचा लालसर पणा दूर करण्याचे घरगुती उपाय

शरीरावर लाली येण्याचे (Redness) अनेक कारणे असू शकतात. या कारणांची माहिती मिळवून तुम्ही ती समस्या दूर करू शकता. शरीरावरची लाली दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय केले जाऊ शकतात.

शरीरावर लाली येण्याची अनेक कारणे असतात. विशेषतः त्वचा निरोगी नसल्याचे हे संकेत असतात. त्वचा लाल होण्याच्या मागे केमिकल रिएक्शन, एलर्जी, सनबर्न ही कारणे देखील असू शकतात. खाजवल्यामुळे, वेदना होत असल्यास, भाजल्यास देखील त्वचा लाल होते.

त्वचेचा लालसर पण कमी करण्यासाठी केमिकलयुक्त उपाय करण्याच्या एवजी घरगुती उपाय करावेत. काही सोप्प्या घरगुती उपायाच्या मदतीने त्वचेची लाली दूर केली जाऊ शकते. चला तर तुम्हाला या घरगुती उपाया बद्दल सांगतो.

शरीराचा लालसर पणा दूर करण्याचे घरगुती उपाय

  1. काकडीचा मास्क
  2. ग्रीन टी
  3. खोबरेल तेल
  4. एलोवेरा
  5. पेट्रोलियम जेली

काकडीचा मास्क

काकडी मध्ये हाइड्रेटिंग गुण असतात जे त्वचेला मोईश्चराइज आणि हाइड्रेट करण्यास मदत करते. याच्या मदतीने त्वचेची खाज आणि लालपणा कमी होतो. याचा वापर करण्यासाठी काकडी किसून घ्या आणि त्याचा लेप शरीरावर लावा आणि 30 मिनिट ठेवा.

ग्रीन टी

ग्रीन टी मध्ये एनटी-इंफ्लेमेटरी आणि त्वचेला पुनर्जीवित करणारे गुण असतात जे त्वचेवर होणारा लालसर पण कमी करतो. याचा वापर करण्यासाठी ग्रीन टी बनवून त्यास रेफ्रिजरेटर मध्ये थंड करा. थंड झाल्या नंतर कापसाच्या मदतीने त्वचा लाल झालेल्या जागी लावा. चांगल्या परिणामासाठी दिवसातून 3 वेळा लावावे.

खोबरेल तेल

खोबरेल तेल त्वचेसाठी चांगले मोईश्चराइजर आहे. हे त्वचेला हाइड्रेट ठेवून लालसर पण कमी करण्यासाठी मदत करतो. याचा वापर करण्यासाठी सर्वात पहिले शरीरास पाण्याने धुवून घ्यावे नंतर कापसाच्या मदतीने खोबरेल तेल लावून मसाज करावा. 30 मिनिटानंतर शरीर धुवून घ्यावे.

एलोवेरा

एलोवेरा मध्ये त्वचेवर आलेली सूज कमी करण्यासाठी एन्टी-इंफ्लेमेटरी गुण असतात. याचा वापर करण्यासाठी शरीरास कोमट पाण्याने धुवून घ्यावे. यानंतर ताज्या एलोवेराच्या पानांमधून जेल काढून प्रभावित भागी लावावे. यानंतर कोमट पाण्याने शरीर धुवून घ्यावे.

पेट्रोलियम जेली

त्वचेची समस्या दूर करण्यासाठी अनेक वर्षा पासून पेट्रोलियम जेली वापरली जात आहे. ही ड्राय स्कीनची समस्या दूर करण्यासाठी मदत करते. ज्यामुळे लालसर पणा कमी होतो. याचा वापर करण्यासाठी पाण्याने शरीर धुवून घ्यावे आणि कोरडे करावे. त्यानंतर पेट्रोलियम जेली रात्रभर लावून ठेवावी. दररोज रात्री झोपण्याच्या अगोदर हा उपाय करावा.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top