health

अचानक आलेल्या उचकीला या 5 पद्धतीने सहज घालवा

जठरात आम्लाचे प्रमाण वाढले की विषकारक पदार्थ तयार झाले किंवा काही असाधारण परिस्थिती निर्माण जाली की जठराबरोबर स्नायुयुक्त पडदाही अचानक आकुंचन पावतो, त्यामुले हवा फुफ्फुसात जाऊन/जाण्यातस अविरोध निर्माण होतो. आणि एक विशिष्ट आवाज निर्माण होतो याला उचकी लागली असे म्हणतात.

डायफ्रॅमच्या आकुंचनामुळे फुफ्फुसातील हवा श्‍वासनलिकेतून बाहेर टाकली जाण्याची क्रिया होते, परंतु स्वरयंत्रणेतील पट्ट्या जवळ असल्यामुळे मोठ्याने आवाज होतो. प्रत्यक्ष उचकी लागत असताना श्‍वास बाहेर पडत असतो. या वेळात श्‍वास आत घेता येत नाही, त्यामुळे व्यक्तीला अस्वस्थपणा जाणवतो. उचकी अर्थातच काही सेकंदसुद्धा रिक्त नसते. त्यामुळे श्‍वास बंद पडण्याची भीती नसते. तरीही उचकी लागणे व श्‍वासावरोध होणे याची मनात सांगड घातली जाते. ही भीती बहुतेक वेळा अनाठायीच असते.

उचकी घालवायचे 5 घरगुती आणि अगदी सोपे उपाय

1) अचानक उचकी लागल्यास लिंबाची एक फोड खावी. त्यामुळे तुमची उचकी निघून जाईल.

2) तसेच प्रवासात किंवा ऑफिसमध्ये असल्यास गोड पदार्थ किंवा चॉकलेट खावं

3) घरी असताना अचानक उचकी लागल्यास जमिनीवर झोपून पुशअप मारावेत. त्यामुळे लगेच उचकी निघून जाईल.

4) तसेच प्रवासात किंवा बाहेर असल्याच उचकी लागल्यास कापडाच्या किंवा कागदी छोट्या पिशवीत हवा भरावी आणि हवा  बाहेर काढावी यामुळे तुमची उचकी लगेच दूर होईल.

5) तसेच जेवताना किंवा ऑफिसमध्ये अचानक उचकी लागल्यास तुम्ही पाणी पिता. पण हे पाणी पिताना थोडी मान वर करून सिलिंककडे पाहिल्यास उचकी निघून जाते.


Show More

Related Articles

Back to top button