Connect with us

हे संकेत सांगतात की आता वेळ आली आहे नवीन नोकरी शोधण्याची

Money

हे संकेत सांगतात की आता वेळ आली आहे नवीन नोकरी शोधण्याची

याबाबतीत कोणतेही दुमत नाही की जीवनात जगण्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागते. कधीकधी आपल्याला चांगल्या पगाराच्या सोबत चांगल्या सहकाऱ्यांची साथ देखील मिळते. आनंदी आणि सुखी राहण्यासाठी आपल्याला जुन्या गोष्टींचा त्याग करावा लागतो. काही लोक आपल्या कमिटमेंट्समुळे आपली नोकरी सोडू शकत नाहीत  यामुळे त्यांना जे पैसे मिळतात त्यावर ते आपला खर्च पूर्ण करतात.

जे लोक सतत आपल्या नोकरीला सोडण्या बद्दल विचार करतात त्यांच्याकडे यासाठी अनेक कारणे असतात. प्रत्येक व्यक्तीसाठी ऑफिस मध्ये एखादा वाईट दिवस किंवा वाईट व्यक्ती समोर येतो ज्यामुळे त्याचा मूड खराब होतो. ऑफिस मधली एखादी कठीण गोष्ट त्यांना जॉब सोडण्यासाठी मजबूर करतो किंवा आपले मन त्या जॉब मध्ये लागू देत नाही.

कधी कधी कामाचे प्रेशर किंवा बॉसचा वाईट व्यवहार हे कारण देखील जॉब मध्ये मन न लागण्याचे कारण ठरते. या गोष्टी फार गंभीर नसतात. परंतु, काही गोष्टी अश्या असतात ज्यांना तुम्ही गंभीरतेने घेतले पाहिजे.

तर चला पाहू कामामध्ये कोणकोणत्या त्या गोष्टी आहेत ज्यांना दुर्लक्षित करून चालणार नाही आणि ज्या खरोखरच तुमच्यासाठी वॉर्निंग आहेत की आता तुम्हाला नोकरी सोडली पाहिजे.

तर दुसरी कडे काही लोक स्वताला हे समजावण्यात यशस्वी होतात की कामामध्ये कितीही वाईट परिस्थिती असली तरी ती वेळेनुसार दूर होईल. जर तुमचा जॉब व्यवस्थित सुरु नसेल आणि जर तुम्हाला हा बदलण्याची गरज असेल तर तुम्हाला खालील संकेत मिळणे सुरु होतात.

निरुत्साही आणि बोरिंग वाटणे

जेव्हा तुम्ही नवीन नवीन काम सुरु करता तेव्हा तुम्हाला सकाळी उत्साही वाटत होते पण आतातर सकाळ पासूनच निरुत्साही वाटते. तर जर तुमच्याकडे भरपूर काम आहे आणि त्यास पूर्ण करताना तुम्हाला बोरिंग वाटते. तुम्हाला असे कधी वाटले नसेल की तुमचा आवडीचा जॉब देखील तुमच्यासाठी निराशाजनक आणि बोरिंग होईल. दररोज तुम्हाला कामावर जाताना असे वाटते की कामावर जाऊ नये आणि बस झाले आता एक दिवसही हे सर्व सहन करू नये. हा नोकरी सोडण्याचा पहिला संकेत आहे.

करियर मध्ये कोणतीही प्रगती न होणे

प्रत्येकाला काहीतरी नवीन शिकण्याचा आणि पुढे जाण्याचा मौका मिळाला पाहिजे पण एक वेळ अशी देखील येते की जेव्हा नोकरी मध्ये काहीही नवीन होत नसते. तुमचे करियर पुढे जात नसते आणि याचा अर्थ असा कि तुम्ही पैसे आणि करियरच्या बाबतीत मागे पडत असता. तुमचे करियर थांबून जाते. त्यामुळे तुम्ही स्वताला असा प्रश्न विचारला पाहिजे की तुम्ही खरच असा जॉब करू इच्छित आहात का ज्यामध्ये कोणतीही प्रगती नाही आहे.

बॉस नापसंत असेल तर

अनेक वेळा नोकरी तर चांगली असते पण बॉस खराब असतो. जर तुम्ही देखील अश्याच काही स्थिती मध्ये असाल तर तुम्हाला पण आपले लक्ष्य गाठण्यात समस्या होऊ शकतात. त्यामुळे तुम्हाल यातून बाहेर पडून पुढे जाण्याचा विचार केला पाहिजे. या कारणामुळे देखील अनेक लोक नोकरी सोडतात कारण ते बॉस सोबत आपल्या समस्या सोडवण्यात यशस्वी होत नाहीत.

सतत स्ट्रेस आणि नाखुश राहणे

जर तुम्ही कामाच्या बाबतीत नाखूष आणि स्ट्रेस मध्ये राहता तर तुम्हाला नोकरी सोडण्याचे संकेत मिळत आहेत. कामाचा जास्त भार देखील स्ट्रेस निर्माण करतो आणि यामुळे मनामध्ये नोकरी सोडण्याचा विचार येतो.

तुमच्या विचारांना महत्व न मिळणे

बहुतेक वेळा ऑफिस मध्ये तुमच्या कामाला बॉस आणि सहकर्मचारी लोक प्रोत्साहन देत नाहीत. जर बॉस आणि सहकारी तुमच्या कामाला महत्व देत नसतील आणि तुमची मेहनत बेकार होत असेल तर अतिशय दुख होते. सोबतच याचा अर्थ हा आहे की तुमच्या चांगल्या कामाला ओळख आणि अप्रूवल मिळत नाही. जर तुमच्या विचारांना महत्व दिले जात नसेल तर हा संकेत आहे की आता नोकरी सोडण्याची वेळ आलेली आहे.

जेलसी वाटणे

जर तुमचे कलीग लिंकडिन वगैरेवर अपडेट राहतात आणि तुम्हाला आपल्या नवीन नोकरी बद्दल कळवतात आणि हे समजल्यावर तुम्हाला दुख किंवा ईर्ष्या होते याचा अर्थ तुम्ही तुमच्या नोकरी वर खुश नाही आहेत. जेव्हा तुमच्या कलीगला नोकरी मिळू शकते तर तुम्हाला पण एक नवीन सुरुवात करण्यासाठी तयार राहिले पाहिजे. परंतु याआधी आपल्या कलीगला हे आवश्य विचारा की त्याने आपल्या करियर मध्ये हा बदल का केला. जर तुम्हाला देखील जर असे काही वाटत असेल की हा देखील नोकरी सोडण्याचा एक संकेत असू शकतो.

कंपनीची वाईट आर्थिकस्थिती

जर तुमची कंपनी वेळेवर तुमचा पगार देऊ शकत नसेल तर तुम्हाला समजले पाहिजे की या कंपनी सोबत तुमचे भविष्य सुरक्षित नाही. याचा अर्थ असा देखील आहे कि या कंपनी मध्ये आता तुमची नोकरी सुरक्षित नाही आहे आणि कंपनीच्या खराब आर्थिक स्थितीमुळे तुम्हाला कधीही नोकरीवरून काढले जाऊ शकते.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top