health

हा आजार एड्स पेक्षा जास्त धोकादायक आहे, हे 6 लक्षण दिसले तर लगेच डॉक्टरांना भेटा

एड्स असा आजार आहे जो रुग्णाला आतून पोखरतो. लोक आता एड्स बद्दल थोडेथोडे जागरूक होण्यास सुरुवात झाली आहे. पण जेवढी जागरूकता पाहिजे तेवढी अजून लोकांना नाही त्यामुळे अनेक वेळा लोकांना हा आजार झाल्याचे लवकर समजत नाही त्यामुळे उशीर होतो. भारतामध्ये दर वर्षी 1 डिसेंबर रोजी वर्ल्ड एड्स दिन साजरा केला जातो. याचा उद्देश लोकांच्या मध्ये एड्स बद्दल जागरूकता पसरवणे आहे. एड्स एक प्रकारचा संक्रामक म्हणजेच पसरणारा आजार आहे. एड्स HIV नावाच्या वायरस मुळे होतो. सुरुवातीला जर निष्काळजी पण किंवा दुर्लक्ष नाही केले तर एड्स पासून वाचता येते. HIV झाल्याचे समजल्यास याच्या उपचाराने व्यक्ती एक निरोगी आणि नॉर्मल लाईफ जगू शकतो. HIV चा उपचार न केल्यास तो एड्सचे रूप घेतो.

पण आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला एड्स बद्दल नाही तर त्यापेक्षा जास्त धोकादायक आजारा बद्दल सांगत आहोत. या आजाराला एड्स पेक्षा जास्त धोकादायक मानले गेले आहे. आम्ही वर एड्स बद्दल चर्चा केली कारण एड्स हा सर्व आजारात सर्वात धोकादायक आहे असा लोकांचा समज आहे. पण WHO च्या रिसर्च अनुसार जगामध्ये एक आजार असा आहे ज्यामध्ये व्यक्ती मरण्याची संख्या एड्स पेक्षा जास्त आहे. हा आजार आहे हेपेताइटिस B. या आजारामध्ये शरीरात HBV वायरस पसरतो. दुषित रक्त ट्रान्सफर किंवा इन्फेक्टेड पार्टनर सोबत इंटरकोर्स केल्याने हा आजार होतो. या मध्ये लीवर इन्फेक्शनची संभावना वाढते पुढे जाऊन लीवर फेलीयार किंवा कैंसर सारखा आजार होतो. यासाठी आज आम्ही या आजाराचे 6 महत्वाचे संकेत सांगत आहोत जे तुम्हाला वेळीच या आजाराच्या निदानासाठी आणि उपचारासाठी मदत करतील.

हेपेटाइटिस B चे लक्षण

हेपेटाइटिस B झालेल्या रुग्णाची त्वचा आणि डोळे पिवळे होतात. जर तुमचे डोळे आणि त्वचा पिवळे दिसत असतील तर एकदा या आजाराची टेस्ट करून पहा.

जर तुमच्या युरीनचा रंग ऑरेंज किंवा ब्राउन झाला असेल तर तुम्हाला हेपेटाइटिस B झाल्याची शक्यता आहे. असे लक्षण दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

दीर्घकाळ आजारी राहणे हे देखील हेपेटाइटिस B चे लक्षण आहे. जर तुम्ही दीर्घकाळा पासून आजारी आहात तर एकवेळा याची टेस्ट नक्की करून पहा.

जर तुम्हाला विनाकारण अनेक महिने थकवा किंवा अशक्तपणा जाणवत असेल तर वेळ वाया न घालवता डॉक्टरांचा सल्ला घ्या. थकवा आणि अशक्तपणा हे देखील हेपेटाइटिस B चे संकेत मानले जातात.

जर तुम्हाला मळमळ होत असेल किंवा उल्टी येत असल्याची भावना होत असेल तर सावध व्हा. हेपेटाइटिस B मध्ये मळमळ आणि उल्टी सारखे वाटणे हा एक महत्वाचा लक्षण आहे.

जर पोटदुखी आणि सूज असा त्रास होत असेल तर हेपेटाइटिस B ची शक्यता डॉक्टरांच्या कडून तपासून घ्या.

ही होती हेपेटाइटिस B चे काही महत्वाची लक्षणे. यापैकी कोणतेही लक्षण दिसल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करा.

अत्यंत महत्वाची सूचना : फेसबुकच्या नवीन नियमानुसार आमचे पेज आता तुमच्या न्यूज फीडवर अतिक्षय कमी दिसणार आहे त्यामुळे आमच्या नवीन पोस्ट तुमच्या पर्यंत पोहोचणे शक्य होणार नाही यासाठी जर तुम्हाला आमचे लेख आवडत असतील तर कृपया आमचे एंड्राइड एप्प आजच डाउनलोड करा त्याची लिंक खाली दिली आहे.

Marathi Gold Android Application Download Link

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : सावधान… जर तुम्ही जेवल्यानंतर लगेच पाणी पीत असाल तर आधी हे वाचा


Show More

Related Articles

Back to top button