Health
विवाहा नंतर कमी होते या गंभीर आजाराची शक्यता, विशेषतः पुरुषांच्या आरोग्याला मिळतात हे लाभ
विवाह अर्थात लग्न करणे ही एक सामाजिक परंपरा आहे ज्यामध्ये दोन व्यक्ती एकरूप होऊन नवीन आयुष्याची सुरुवात करतात आणि लग्न तुम्हाला सामाजिक आणि व्यवहारिक रूपाने मजबुती देतात. पण जर तुम्हाला म्हंटले की विवाह फक्त तुम्हाला सामाजिक लाभ देण्या सोबतच आरोग्याला देखील लाभ देतात आणि अनेक गंभीर आजाराचा धोका कमी करतो. कदाचित तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही पण हे खरे आहे ज्याचा खुलासा हल्लीच झालेल्या एका आरोग्य विषयक सर्वे मध्ये झाला आहे. आज आम्ही तुम्हाला याच सर्वेच्या आधारावर तुम्हाला विवाह केल्यामुळे कोणकोणते आरोग्य विषयक फायदे होतात हे सांगत आहोत.
या आरोग्य विषयक सर्वेनुसार अविवाहित व्यक्तीच्या तुलने मध्ये विवाहित पुरुषाची लवकर मरण्याची शक्यता 6 टक्के कमी असते. खरेतर 7 वर्षाच्या अभ्यासा दरम्यान मेडिकल सायन्स या निष्कर्षांवर पोचला आहे की विवाहित पुरुष सिंगल लोकांच्या तुलनेत जास्त निरोगी राहतात आणि जास्त काळ जीवन जगतात. यामागे वैज्ञानिकांचा तर्क आहे की महिला आपल्या पतीची देखभाल व्यवस्थित करते. पत्नी आपल्या पतीच्या खाण्यापिण्याच्या आणि मेडिकलच्या रुटीनची व्यवस्थित काळजी घेते. सोबतच पत्नी आपल्या पतीवर येणारा तणाव वाटून घेते.
याव्यतिरिक्त बरेचसे काम पत्नी स्वता करतात तर दुसऱ्या बाजूला सिंगल पुरुषाला आपली सर्व कामे स्वताच करावी लागतात. अश्या मध्ये वैज्ञानिक लोक या निष्कर्षां वर पोहचले की सर्व पुरुषांनी विवाह हा केलाच पाहिजे.
वल्ड हार्ट फेडरेशन ने आपल्या रिपोर्ट मध्ये म्हंटले आहे की विवाह केल्या नंतर लोकांना जे प्रेम आणि सहयोग मिळतो तो हृदयाच्या मजबुतीसाठी सर्वोत्तम औषधी आहे. हेल्थ स्पेशालिस्ट लोकानाचे मानणे आहे की प्रेमाने भावनात्मक आधार मिळतो आणि यामुळे हृदयावर अतिरिक्त ताण पडत नाही. हेच कारण आहे की विवाहित पुरुषांना अविवाहित पुरुषांच्या तुलनेत हार्ट अटैकची शक्यता कमी असते.
वल्ड हार्ट फेडरेशन ने हार्ट अटैक, पक्षाघात किंवा हिप फ्रेक्चर सारख्या गंभीर आजाराने ग्रासलेल्या 240 रुग्णांचे विश्लेषण केले आणि त्यांना आढळले की या गंभीर आजारांना बरे करण्यासाठी जेवढे योगदान मेडिसिन चे असते, त्यापेक्षा अधिक मदत व्यक्तीचा सकारात्मक विचार असतो.
विशेषज्ञाना आढळले की सामाजिक पणे वेगळे पडलेल्या व्यक्तीला हार्ट अटैक किंवा कोरोनरी हे आजार होण्याची जास्त शक्यता असते.
लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका
वाचा : भाग्यशाली असतात ते पुरुष ज्यांच्या पत्नी मध्ये असतात हे चार गुण, सोबतच होते घरात खूप बरकत
