foodhealth

बडीशेप या पद्धतीने खाण्यामुळे बद्धकोष्ठता, गॅस, आंबट डकार, वजन घटवणे आणि इतर 14 रोगात वरदान आहे

जेवण झाल्यावर बडीशेप खाणे आपल्याला आवडते. बडीशेप मध्ये औषधी गुण सुध्दा असतात. यामध्ये खनिज आणि विटामिन सोबतच पोषक तत्व असतात. बडीशेप अपचन दूर करते, पोटदुखी आणि श्वासा संबंधीत आजारात औषधी म्हणून वापरली जाते.

बडीशेपचे 14 फायदे

बडीशेप खाण्यामुळे बद्धकोष्ठता आणि गॅसची समस्या राहत नाही. बडीशेप साखरे सोबत बारीक करून चूर्ण तयार करा. रात्री झोपण्या पूर्वी जवळजवळ 5 ग्राम चूर्ण कोमट पाण्या सोबत प्यावे. यामुळे पोटाच्या समस्या होणार नाहीत आणि बद्धकोष्ठता आणि गॅस दूर होईल.

डोळ्यांची दृष्टी बडीशेपच्या मदतीने वाढवता येई शकते. यासाठी सौंफ आणि खडीसाखर समान घेऊन बारीक पावडर करा. हे एक चमचा सकाळ-संध्याकाळ पाण्या सोबत दोन महिने घ्या. यामुळे डोळ्यांची नजर वाढेल.

डायरिया झाल्यावर बडीशेप खावी. सौंफ आणि बेलाचा गर एकत्र सकाळ-संध्याकाळ खाण्यामुळे अजीर्ण बरे होते आणि अतिसार मध्ये फायदा होतो.

जेवल्यानंतर बडीशेप खालल्यामुळे जेवण चांगले पचते. बडीशेप, काळे मीठ आणि जीरे एकत्र घेऊन चूर्ण बनवा. जेवण झाल्यावर हे चूर्ण कोमट पाण्यासोबत घ्यावे, हे एक उत्तम पाचक चूर्ण आहे.

खोकला झाल्यावर बडीशेप फायदा देते. बडीशेपचे 10 ग्राम अर्क मधा मध्ये मिक्स करून खावे यामुळे खोकला येणे बंद होते.

जर तुमच्या पोटात दुखत असेल तर भाजलेली बडीशेप खावी यामुळे आराम मिळतो. बडीशेपची थंडाई बनवून प्यावी. यामुळे गरमी शांत होते आणि जीवघाबरणे बंद होते.

जर आंबट डकार येत असतील तर थोडीशी बडीशेप पाण्यात मिक्स करून उकळून घ्या त्यामध्ये खडी साखर टाकून प्या. दोन-तीन वेळा असे केल्याने आराम मिळेल.

हाता पायात जळजळ होत असेल तर बडीशेप आणि धने सम प्रमाणात घेऊन बारीक पावडर करा आणि यात खडीसाखर मिक्स करू खाण्यामुळे काही दिवसात आराम मिळेल.

घसा खवखवत असेल तर बडीशेप खावी. बडीशेप खाण्यामुळे बसलेला गळा पण पुन्हा खुलतो.

दररोज सकाळ-संध्याकाळ बडीशेप खाण्यामुळे रक्त साफ होते ज्यामुळे त्वचेला फायदा होतो, यामुळे त्वचा चमकदार होते.

पोट सुजले असेल तर बडीशेप औषधीचे काम करते.

अपचन, अल्सर, आंबट डकार, अमलपित्त इत्यादी आजारात बडीशेप परिणामकारक आहे. ही पोटातील एसिडची तीव्रता कमी करते, तसेच पोटा संबंधीच्या इतर समस्यांना कमी करते.

उलटी होण्याचा त्रास होत असेल तर बडीशेप फायदा करते.

बडीशेप पचनक्रिया वाढवण्यास मदत करते. त्यामुळे अतिरिक्त चर्बी साठण्यापासून दूर राहता येते. बडीशेप वजन कमी करण्यास मदत करते.

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : कानातील मळ काढण्याची अचूक पद्धत तुम्हाला माहीत आहे का


Show More

Related Articles

Back to top button