astrologydharmik

वाईट काळ येण्याच्या अगोदर परमेश्वर देतात 8 संकेत, समजले तर बनाल सावध

आपल्या जीवना मध्ये काहीही होते त्याबद्दलचे संकेत निसर्ग आपल्याला काही अगोदरच देत असते. आता महत्वाची गोष्ट आहे कि हे संकेत आपल्या पैकी बऱ्याच लोकांना समजत नाहीत. आज आम्ही तुम्हाला 8 संकेत सांगत आहोत ज्यांना तुम्ही योग्य वेळी ओळखले तर तुम्ही वाईट काळात कधीही विचलित होणार नाहीत. आपला वाईट काळ येण्याच्या अगोदर ईश्वर आपल्याला हे 8 संकेत देतो.

देव कधीही आपल्या भक्तांची स्वतः रक्षण करत नाहीत तर ते कोणत्याना कोणत्या रूपाने भक्तांची मदत करत असतात हे मदत ओळखणे आणि त्याचा योग्य फायदा घेणे आपल्या हातात असते. चला पाहू कोणते संकेत ईश्वर आपल्याला देतात ज्यामुळे आपल्याला पूर्व कल्पना येते कि आपला वाईट काळ सुरु होणार आहे आणि त्याची पूर्व योजना आपण करणे आवश्यक आहे.

वाईट काळ येत असल्याचे हे 8 संकेत सांगतात

कुंकू लावताना कुंकवाचा करंडा पडणे पतीच्या व्यवसायामध्ये वाईट काळ येणार असल्याचे संकेत देतो.

अवेळी आणि विनाकारण दुधाचे खराब होणे या गोष्टीचा संकेत आहे कि घरामध्ये मोठा वादविवाद होणार आहे किंवा एखादा मोठा आजार होण्याची शक्यता आहे.

वाईट स्वप्नांचे दररोज येणे या गोष्टीचा संकेत आहे कि घरात वाद होणार आहे, यामुळे व्यवसायात मंदी येण्याचे संकेत देखील समजावे. यादोन्ही सोबत वाईट स्वप्न नेहमी आल्यास कुटुंबातील एखाद्या सदस्यावर मोठे संकट येणार असल्याचे संकेत देखील देतात.

जर तुमच्या घराच्या आजूबाजूला तुम्ही पाळलेली मांजर वेगवेगळ्या प्रकारचे आवाज काढत असेल तर आणि घाबरत असेल तर समजावे कि तुमच्या घराच्या आसपास नकारात्मक उर्जा काम करत आहे. जी समस्यांची वाहक होऊ शकते.

मंगळसूत्र अचानक तुटणे पतीच्या जीवनावर संकट येण्याचे संकेत देतात. अश्या स्थितीत पत्नीने तुळशीची पूजा केली पाहिजे.

घरातून बाहेर पडल्यावर नेहमी भांडण किंवा मारामारी दिसत असेल तर कोणाच्या सोबत वाद किंवा नातेसंबंधात वाईटपणा येण्याची शक्यता.

जर पूजा करताना पूजेचे ताट पडले तर समजावे कि देवता रुष्ट आहेत. यासाठी पूजेमध्ये सुधारणेची गरज आहे.

जेवताना पहिला घास कडू लागणे आणि दुसऱ्यांना सामान्य लागणे या गोष्टींचा संकेत आहे कि तुमच्या एखाद्या नातेवाइका कडून वाईट बातमी येऊ शकते. एवढेच नाही तर तुमचे बनत असलेले नाते बिघडू शकते.


Tags
Show More

Related Articles

Back to top button