Featuredhealth

7 रात्र चेहऱ्यावर हे लावा किती ही जिद्दी दाग-धब्बे असतील ते निघून जातील, स्कीन 20 वर्ष तरुण दिसेल, सुंदर, चमकदार होईल, सुरकुत्या निघून जातील

सर्वांना आपला चेहरा गोरा असावा आणि त्यावर कोणतेही दाग-धब्बे नसावे असे वाटते. यासाठी लोक महागडे ब्युटी प्रोडक्ट विकत आणतात जे दावा करतात की 7 दिवसात किंवा महिन्याभरात तुम्हाला गोरी त्वचा मिळेल. ज्याची जाहिरात बॉलीवुडच्या प्रसिध्द अभिनेत्री देतात पण हे दावे खोटे ठरतात. अश्या महागड्या प्रोडक्टमुळे आपली त्वचा गोरी तर होत नाही पण आपले पैसे मात्र त्यांच्या खिशात जातात. पण जर तुम्ही घरगुती उपाय केले तर ते महागडे नसतात आणि अनेक वर्षापासून लोक त्याचा अनुभव घेत असल्यामुळे त्यांच्यावर लोकांचा विश्वास पण असतो.

घरगुती उपायात तुम्हाला चेहऱ्याच्या त्वचेची काळजी घ्यावी लागते. चेहरा गोरा करण्यासाठी तुम्हाला अनेक वेळा चेहरा धुवावा लागतो, चेहऱ्यावर फेस पैक लावावा लागतो किंवा लिंबू, दही किंवा पपईने चेहऱ्याची मालिश करण्यास सागितले जाते. पण आज आम्ही जो उपाय सांगत आहोत त्यामध्ये हे सर्व करण्याची गरज नाही आणि तुम्हाला सुरकुत्या पडलेली स्कीन, सैल झालेली त्वचा यापासून सुटका देऊन सुंदर त्वचा देईल.

आज येथे तुम्हाला Marathi Gold च्या माध्यमातून 7 रात्रीतून तुमच्या चेहऱ्यावरील जिद्दी आणि जुने दाग-धब्बे दूर कसे करता येईल आणि चेहरा नैसर्गिक पणे कसा उजळवता येईल हे पाहणार आहोत. हा उपाय बाजारातील महागड्या प्रोडक्ट पेक्षा किती तरी पटीने जास्त परिणामकारक आहे. यामुळे तुमच्या चेहऱ्याची त्वचा 20 वर्ष तरुण दिसेल ज्यामुळे तुमचा चेहरा टवटवीत दिसेल. चला तर पाहू हा उपाय.

साहित्य :

एक चमचा एलोवेराएक

एक चमचा बीटाचा रस किंवा जेल

अर्धा चमचा ओलिव ओईल

¼ चमचा हळद

काही थेंब लिंबूचा रस

काही थेंब मध

गुलाब जल

पेस्ट तयार करण्याची कृती आणि लावण्याची पद्धत

सर्वात पहिले एक भांडे घ्या त्यामध्ये एक चमचा एलोवेरा जेल आणि एक चमचा बीट जेल मिक्स करा. त्यानंतर त्यामध्ये ओलिव ओईल अर्धा चमचा मिक्स करा. ओलिव ओईल चेहरा उजळवतो आणि दाग कमी करतो. यात दोन चिमुट हळद मिक्स करा हळद एन्टीसेप्टिकचे काम करते. हळद चेहऱ्यावरील मुरुमे आणि फोड्या दूर करते. आता यामध्ये दोन-तीन थेंब लिंबू रस टाका. लिंबा मध्ये विटामिन सी असते जे त्वचेसाठी आवश्यक असते. लिंबू चेहऱ्यावरील डार्क स्पॉट फिक्के करते. सर्वात शेवटी यामध्ये तीन-चार थेंब मध मिक्स करा. हे सर्व साहित्य एकत्र चांगले मिक्स करा ज्यामुळे तुमची क्रीम तयार होईल.

ही क्रीम लावण्या अगोदर चेहरा गुलाब जलने चांगला धुवून घ्या आणि कापसाने स्वच्छ करा. तुम्ही तयार केलेली क्रीम हलक्या हाताने चेहऱ्यावर लावा आणि 2 मिनिट मालिश करा. तुम्ही ही क्रीम गळ्याला सुध्दा लावू शकता.

क्रीम लावल्यानंतर रात्रभर ती तशीच चेहऱ्यावर राहु द्या. त्यानंतर सकाळी थंड पाण्याने चेहरा धुवून घ्या. ही प्रक्रिया तुम्ही 7 दिवस करा आणि तुम्हाला दिसून येईल की चेहऱ्यावरील दाग-धब्बे आणि सुरकुत्या निघून गेले आहेत आणि तुमची त्वचा तरुण, सुंदर आणि चमकदार झाली आहे.

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : काळे डाग दूर करण्यासाठी फायदेशीर घरगुती उपाय


Show More

Related Articles

Back to top button