Xiaomi लवकरच आपल्या लोकप्रिय S-सीरीज (S-Series) मध्ये तीन वर्षांनंतर नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन सादर करणार आहे. कंपनीचे सह-संस्थापक लिन बिन (Lin Bin) यांनी शाओमीच्या 15व्या वर्धापन दिनानिमित्त (6 एप्रिल) चाहत्यांशी संवाद साधताना या नव्या फोनविषयी अधिकृत संकेत दिले आहेत. त्यांनी Xiaomi 15S Pro या मॉडेलचे नाव स्पष्टपणे घेतले असून, हे या फोनचे पहिले अधिकृत उल्लेख मानले जात आहेत, जरी अद्याप कोणतेही प्रमोशनल मटेरियल समोर आलेले नाही.
S-सीरीजमध्ये तीन वर्षांनी परतणार फ्लॅगशिप डिव्हाइस
GizmoChina च्या अहवालानुसार, Xiaomi 15S Pro हा Xiaomi 12S नंतरचा S-सीरीजमधील पहिला फ्लॅगशिप फोन असेल, जो जवळपास तीन वर्षांपूर्वी लाँच करण्यात आला होता. लीक झालेल्या माहितीनुसार, नव्या फोनमध्ये Xiaomi 15 Pro चे कोर डिझाईन एलिमेंट्स असतील, ज्यामध्ये 2K क्वाड-कर्व्ह्ड डिस्प्ले आणि Leica चा ट्रिपल कॅमेरा सेटअप असेल.
6000mAh पेक्षा मोठी बॅटरी होण्याची शक्यता
या फोनमध्ये सर्वात मोठा अपग्रेड बॅटरीच्या बाबतीत असण्याची शक्यता आहे. रिपोर्ट्सनुसार, Xiaomi 15S Pro मध्ये 6000mAh पेक्षा जास्त क्षमता असलेली बॅटरी मिळू शकते. याशिवाय, 3C सर्टिफिकेशन लिस्टिंग नुसार, फोन 90W फास्ट चार्जिंग सपोर्ट करणार आहे.
इन-हाउस प्रोसेसरसह जबरदस्त परफॉर्मन्स
या आगामी फोनमध्ये Xiaomi आपला इन-हाउस चिपसेट वापरण्याची शक्यता आहे. TSMC च्या N4P प्रोसेसवर आधारित हा चिपसेट स्टँडर्ड थ्री-क्लस्टर आठ-कोर लेआउट वापरत आहे. प्राथमिक अंदाजानुसार, याचा परफॉर्मन्स Snapdragon 8 Gen 1 च्या बरोबरीचा असू शकतो, आणि चांगल्या ऑप्टिमायझेशनसह तो Gen 2 ला देखील टक्कर देऊ शकतो.
Xiaomi SU7 EV ला अनलॉक करणारी UWB टेक्नोलॉजी परतणार?
Xiaomi 15S Pro मध्ये UWB (Ultra-Wideband) कनेक्टिव्हिटी देखील परत येण्याची शक्यता आहे, जी याआधी Xiaomi MIX 4 मध्ये पाहायला मिळाली होती. ही तंत्रज्ञान वापरकर्त्याला सुस्पष्ट स्थानिक जाणीव (spatial awareness) देत असल्यामुळे, हे फीचर Xiaomi SU7 EV सारख्या कार्सना अनलॉक करण्यासाठी आदर्श ठरतं.
जरी अद्याप या डिव्हाइसच्या पूर्ण स्पेसिफिकेशन्स समोर आलेल्या नाहीत, तरी कंपनीकडून मिळालेल्या संकेतांनुसार, हा हाय-एंड स्मार्टफोन लवकरच म्हणजेच कदाचित या महिन्याच्या अखेरीस लॉन्च होऊ शकतो.