चीनी टेक ब्रँड Vivo ने भारतीय बाजारात आपला नवीन बजेट स्मार्टफोन Vivo Y39 5G लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनला स्टायलिश डिझाइन आणि प्रीमियम फीचर्ससह बाजारात सादर करण्यात आले आहे. या डिव्हाइसचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये 6500mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली असून BlueVolt टेक्नोलॉजी सपोर्टसह येते. कंपनीचा दावा आहे की, या फोनची बॅटरी तब्बल पाच वर्षे उत्तम स्थितीत राहील.
Vivo Y39 5G च्या डिझाइन आणि AI फीचर्स
Vivo Y39 5G मध्ये ड्युरेबल बिल्ड क्वालिटी देण्यात आली असून, हा फोन मिलिटरी-ग्रेड सर्टिफिकेशन प्राप्त आहे. याच्या डिस्प्लेला शील्ड ग्लास प्रोटेक्शन मिळते आणि SGS सर्टिफिकेशन देखील प्राप्त झाले आहे. याशिवाय, यामध्ये AI स्क्रीन ट्रान्सलेशन, लाईव्ह टेक्स्ट, AI ऑडिओ अल्गोरिदम, सर्कल टू सर्च आणि AI सुपरलिंक यांसारखे अनेक स्मार्ट फीचर्स समाविष्ट करण्यात आले आहेत.
Vivo Y39 5G ची किंमत आणि उपलब्धता
नवीन Vivo Y39 5G दोन कलर ऑप्शनमध्ये सादर करण्यात आला आहे – Lotus Purple आणि Ocean Blue. याच्या 8GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ₹16,999 ठेवण्यात आली आहे, तर 8GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंट ₹18,999 मध्ये उपलब्ध आहे. हा फोन Amazon, Flipkart, तसेच ऑफलाइन स्टोअर्स आणि Vivo India च्या ई-स्टोअरवर खरेदीसाठी उपलब्ध असेल.
नवीन फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ₹1,500 कॅशबॅक मिळणार आहे. हा ऑफर 6 एप्रिल 2025 पर्यंत लागू असेल.
Vivo Y39 5G चे स्पेसिफिकेशन्स
Vivo Y39 5G मध्ये 6.68-इंच डिस्प्ले देण्यात आला असून तो 120Hz रिफ्रेश रेट आणि 1000nits पीक ब्राइटनेस सपोर्ट करतो. याच्या स्क्रीनला TÜV Rheinland Eye Protection सर्टिफिकेशन मिळाले आहे. हा फोन Android 15 वर आधारित FunTouchOS 15 वर कार्य करतो.
फोटोग्राफीसाठी याच्या बॅक पॅनलवर Sony 50MP HD मुख्य कॅमेरा आणि 2MP बोकेह कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8MP फ्रंट कॅमेरा मिळतो. तसेच, यामध्ये ड्युअल व्ह्यू व्हिडिओ आणि AI नाईट मोड यांसारखे फीचर्स देखील दिले आहेत.
परफॉर्मन्ससाठी Qualcomm Snapdragon 4 Gen 2 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 44W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येतो आणि 6500mAh क्षमतेची मोठी बॅटरी मिळते, जी दीर्घकालीन बॅटरी बॅकअप देते.