Vivo लवकरच आपल्या लोकप्रिय X सीरिजमधील नवीन स्मार्टफोन बाजारात सादर करणार आहे. कंपनीचा हा आगामी स्मार्टफोन Vivo X200 Ultra नावाने 21 एप्रिल रोजी लाँच होणार आहे. लाँचिंगला काही दिवस बाकी असतानाच प्रसिद्ध टिपस्टर Abhishek Yadav यांनी या फोनचे स्पेसिफिकेशन्स आणि वैशिष्ट्ये शेअर करून वापरकर्त्यांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, Vivo X200 Ultra मध्ये 6000mAh क्षमतेची दमदार बॅटरी, 90 वॉटची फास्ट चार्जिंग आणि Snapdragon 8 Elite चिपसेटसह अनेक अत्याधुनिक फीचर्स असणार आहेत.
दमदार वैशिष्ट्यांसह येणार Vivo X200 Ultra
टिपस्टरच्या X पोस्टनुसार, Vivo X200 Ultra मध्ये 6.82 इंच 2K AMOLED डिस्प्ले देण्यात येणार आहे, जो 120Hz refresh rate ला सपोर्ट करेल. डिस्प्लेचे संरक्षण करण्यासाठी यामध्ये Armour Glassचा वापर करण्यात आलेला आहे.
स्टोरेजसाठी या फोनमध्ये LPDDR5x RAM आणि UFS 4.0 storage मिळणार आहे. प्रोसेसिंगसाठी फोनमध्ये Adreno 830 GPUसह Snapdragon 8 Elite chipset देण्यात येणार आहे.
फोनमध्ये 6000mAh क्षमतेची बॅटरी मिळेल, जी 90W fast charging ला सपोर्ट करेल. याशिवाय फोनमध्ये 40W wireless charging ची सुविधाही असणार आहे. या फोनमध्ये bypass charging support सुद्धा दिले जाईल. सॉफ्टवेअरबाबत सांगायचे झाले तर, Vivo X200 Ultra Android 15 वर आधारित असेल.
बायोमेट्रिक सिक्योरिटीसाठी यामध्ये 3D ultrasonic in-display fingerprint sensor दिला जाईल. Vivo च्या या फोनची जाडी 8.69mm इतकी आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये Wi-Fi 7, 6 आणि 5 सपोर्ट मिळेल, तसेच Bluetooth 5.4 ची सुविधा देण्यात आली आहे. हॅप्टिक फीडबॅकसाठी फोनमध्ये X-axis linear motor दिला जाणार आहे.
फोनमध्ये एक खास टेक्नोलॉजी म्हणजे circular polarized light eye-protection technology सुद्धा दिली जाणार आहे. तसेच, या फोनमध्ये जबरदस्त कॅमेरा सेटअप असणार असून 200MP camera सुद्धा यामध्ये समाविष्ट केला जाऊ शकतो.