Vivo ने आज भारतात आपला नवीन स्मार्टफोन Vivo T4 5G लॉन्च केला असून, हा फोन दमदार बॅटरी, स्मूथ परफॉर्मन्स आणि प्रीमियम डिझाइनसह सादर करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये Android 15 वर आधारित Funtouch OS 15 देण्यात आले आहे आणि तो Snapdragon 7s Gen 3 Mobile Platform प्रोसेसरवर कार्य करतो. या मोबाईलची सर्वात मोठी खासियत म्हणजे यामध्ये देण्यात आलेली 7,300mAh बॅटरी आहे. पुढे याची सविस्तर माहिती वाचा.
किंमत आणि उपलब्धता
Vivo T4 5G स्मार्टफोनची किंमत ₹21,999 पासून सुरू होते, ज्यामध्ये 8GB RAM आणि 128GB स्टोरेज मिळते. याचा 12GB RAM असलेला वेरिएंट ₹25,999 मध्ये मिळेल. हा मोबाईल 29 एप्रिलपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार असून Emerald Blaze आणि Phantom Grey या रंगांमध्ये खरेदी करता येईल. सुरुवातीच्या सेलमध्ये HDFC आणि SBI बँक युजर्सना Flipkart वर ₹2,000 पर्यंतचा डिस्काउंट मिळू शकतो.
Vivo T4 5G बॅटरी
हा फोन 7,300mAh इतक्या शक्तिशाली बॅटरीसह सादर करण्यात आला आहे, जी या सेगमेंटमधील इतर मोबाईल्सपेक्षा वेगळा बनवते. इतकी मोठी बॅटरी सतत गेमिंग, व्हिडीओ स्ट्रीमिंग आणि सोशल मीडिया वापरासाठी पुरेशी ठरते. यामध्ये 90W Fast Charging चा सपोर्ट देखील आहे, ज्यामुळे काही मिनिटांत फोन चार्ज होतो. बॅटरीचा हा कॉम्बिनेशन युजर्सना एका दिवसाहून अधिक बॅकअप देतो, त्यामुळे वारंवार चार्जिंगची चिंता राहत नाही.
या फोनच्या बॅटरी क्षमतेचे मूल्यांकन करण्यासाठी काही इन-हाउस चाचण्या घेतल्या. यामध्ये Vivo T4 5G ने PC Mark Battery Benchmark मध्ये 18 तास 1 मिनिट इतका स्कोअर मिळवला. 30 मिनिट YouTube व्हिडीओ प्ले केल्यावर बॅटरीमध्ये केवळ 3% घट झाली. फास्ट चार्जिंग स्पीड चाचणीत, 20% ते 100% चार्जिंगसाठी केवळ 45 मिनिटे लागली.
Vivo T4 5G स्पेसिफिकेशन्स
डिस्प्ले: या फोनमध्ये 6.77-इंच Full HD+ AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिझोल्यूशन 2392×1080 पिक्सेल आहे. 120Hz Refresh Rate आणि 1300 nits Brightness मुळे डिस्प्ले अतिशय स्मूथ आणि ब्राइट अनुभव देतो. यामध्ये P3 Color Gamut सपोर्ट आणि 387 PPI Pixel Density देखील दिली आहे.
कॅमेरा: फोटोग्राफीसाठी यामध्ये Triple Rear Camera Setup देण्यात आले असून, यात 50MP OIS Support असलेला प्रायमरी कॅमेरा, 2MP सेकेंडरी लेंस आणि 8MP फ्रंट कॅमेरा आहे. फ्रंट कॅमेरा f/2.0 Aperture, तर रिअर कॅमेरा f/1.8 आणि f/2.4 Aperture सह येतो.
परफॉर्मन्स: या फोनमध्ये Snapdragon 7s Gen 3 Mobile Platform प्रोसेसर देण्यात आला आहे, जो 4nm Process Technology वर आधारित आहे. यामध्ये 8-Core CPU असून त्याची क्लॉक स्पीड 2.4GHz पर्यंत जाते. हा चिपसेट ऊर्जा कार्यक्षमतेसह मल्टीटास्किंगसाठी उत्कृष्ट परफॉर्मन्स देतो.
रॅम आणि स्टोरेज: फोनमध्ये दोन वेरिएंट्स आहेत – 8GB RAM + 128GB Storage आणि 12GB RAM + 256GB Storage. यात LPDDR4X RAM आणि UFS 2.2 Storage वापरण्यात आली आहे, त्यामुळे यूजर्सना स्मूथ परफॉर्मन्स आणि जलद डेटा स्पीड मिळतो. याशिवाय, 8GB Virtual RAM Expansion चा सपोर्टही आहे, त्यामुळे जड अॅप्स आणि मल्टीटास्किंगमध्ये कोणतीही अडचण येत नाही.
फीचर्स: फोनमध्ये IP65 Rating आहे, म्हणजे तो धूळ आणि पाण्याच्या हलक्या शिंतोड्यांपासून सुरक्षित राहतो. यामध्ये In-display Optical Fingerprint Sensor, Dual SIM Support, 5G Connectivity आणि Composite Plastic Back Design आहे. फोनचे वजन 199 ग्राम आहे.