Vivo ने अलीकडेच आपल्या T सीरीजमधील Vivo T4x हा फोन मोठ्या बॅटरीसह सादर केला होता. आता कंपनी T सीरीजमधील आणखी एक दमदार फोन Vivo T4 सादर करण्याच्या तयारीत आहे, ज्यामध्ये T4x पेक्षा देखील मोठी बॅटरी असणार आहे. हा स्मार्टफोन 22 एप्रिल रोजी भारतात लॉन्च केला जाणार आहे आणि त्याचा टीझर आधीच प्रसिद्ध झाला आहे. कंपनीने यासंबंधी काही प्रमुख फिचर्सची माहिती देखील अधिकृतपणे दिली आहे.
Vivo T4 चे वजन आणि जाडी किती असेल?
Vivo T4 मध्ये 7300mAh क्षमतेची शक्तिशाली बॅटरी असणार आहे. कंपनीचा दावा आहे की Vivo T4 हा भारतातील असा पहिला आणि सर्वात पातळ स्मार्टफोन असणार आहे, ज्यामध्ये इतकी मोठी बॅटरी दिली जाईल. या फोनची जाडी केवळ 7.89mm आहे आणि वजन फक्त 199 ग्रॅम आहे. हा स्मार्टफोन Phantom Grey कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध असणार आहे.
Vivo T4 ची भारतातील (संभाव्य) किंमत
Vivo T4 ची किंमत भारतात अंदाजे ₹20,000 ते ₹25,000 दरम्यान असू शकते. याआधी लाँच झालेल्या Vivo T3 ची किंमत ₹19,999 पासून सुरू झाली होती आणि Vivo T2 ची किंमत ₹18,999 होती. त्यामुळे T4 ची किंमत फार मोठी वाढ न करता निश्चित केली जाण्याची शक्यता आहे.
Vivo T4 चे लीक फिचर्स
Vivo T4 मध्ये दिली जाणारी 7300mAh बॅटरी 90W Wired FlashCharge चार्जिंगला सपोर्ट करणार आहे. यासोबतच, हा फोन Reverse Charging ला देखील सपोर्ट करेल, ज्यामुळे युजर्स इतर डिव्हाइसेस देखील चार्ज करू शकतील आणि Charging Bypass सुद्धा करता येईल.
डिस्प्लेबाबत बोलायचं झालं तर, Vivo T4 5G मध्ये 6.67-इंच Full HD+ AMOLED Quad-Curved Display असण्याची शक्यता आहे, जो 120Hz Refresh Rate ला सपोर्ट करेल.
या फोनमध्ये In-Display Fingerprint Sensor आणि IR Blaster सुद्धा दिले जाऊ शकतात, जे सामान्यतः Vivo च्या उच्च श्रेणीतील फोन्समध्ये दिसून येतात. डिव्हाइसला Snapdragon 7s Gen 3 Chipset असण्याची शक्यता आहे.
कॅमेराबाबत बोलायचं झालं तर, Vivo T4 5G मध्ये Dual Rear Camera Setup मिळेल. यात 50MP Sony IMX882 Sensor (Optical Image Stabilization सह) आणि 2MP Secondary Sensor असेल. सेल्फीसाठी 32MP Front Camera दिला जाऊ शकतो.