Vivo ने चीनमध्ये आपले दोन नवीन टॅबलेट – Vivo Pad 5 Pro आणि Vivo Pad SE लॉन्च केले आहेत. Vivo Pad 5 Pro हे 16GB पर्यंतच्या रॅम (RAM) आणि 512GB पर्यंतच्या इंटरनल स्टोरेज (Internal Storage) पर्यायांसह सादर करण्यात आले आहे. याचा एक Ultra Light Edition देखील लाँच झाला आहे. Vivo Pad 5 Pro ची प्रारंभिक किंमत चीनमध्ये 2999 युआन (सुमारे ₹35,080) इतकी आहे.
दुसरीकडे, Vivo Pad SE मध्ये कंपनीने Soft Light Edition देखील उपलब्ध करून दिले आहे. हे टॅबलेट 8GB पर्यंतच्या रॅम आणि 256GB पर्यंतच्या स्टोरेज पर्यायासह सादर करण्यात आले असून, याची किंमत 999 युआन (सुमारे ₹11,685) पासून सुरू होते.
Vivo Pad 5 Pro चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
या टॅबलेटमध्ये 13 इंचाचा 3.1K LCD Panel देण्यात आला आहे जो 144Hz रिफ्रेश रेट (Refresh Rate) ला सपोर्ट करतो. यामध्ये 16GB पर्यंतची LPDDR5x RAM आणि 512GB पर्यंतचा UFS 4.0 Storage देण्यात आला आहे. प्रोसेसरच्या बाबतीत, यात Dimensity 9400 Chipset देण्यात आले आहे. फोटोग्राफीसाठी यात 13MP रिअर कॅमेरा असून, सेल्फीसाठी 8MP फ्रंट कॅमेरा आहे.
हे टॅबलेट Android 15 वर आधारित OriginOS 5 वर कार्यरत आहे. यात 12050mAh क्षमतेची मोठी बॅटरी दिली गेली असून, ही बॅटरी 66W फास्ट चार्जिंग (Fast Charging) ला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये Wi-Fi 7 802.11 be (2.4GHz + 5GHz), Bluetooth 5.4, USB Type-C आणि NFC यांसारखे पर्याय उपलब्ध आहेत. उत्कृष्ट ऑडिओसाठी यात Vivo ने 8 स्पीकर्स दिले आहेत.
Vivo Pad SE चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
या टॅबलेटमध्ये 2.5K रिझोल्युशनसह 12.3 इंचाचा डिस्प्ले आहे, जो 90Hz रिफ्रेश रेट ला सपोर्ट करतो. यामध्ये 8GB पर्यंतची LPDDR4x RAM आणि 256GB पर्यंतचा UFS 3.1 Storage दिला आहे. या डिव्हाइसमध्ये Snapdragon 4 Gen 2 Processor वापरण्यात आला आहे. फ्रंट आणि रिअर कॅमेरासाठी दोन्ही ठिकाणी 5MP चे कॅमेरे देण्यात आले आहेत.
Vivo Pad SE मध्ये 8500mAh क्षमतेची बॅटरी दिली असून, ती 15W फास्ट चार्जिंग ला सपोर्ट करते. हे टॅबलेट देखील Android 15 वर आधारित OriginOS 5 HD वर चालते.