₹10,000 च्या आत जबरदस्त 5G स्मार्टफोन, या 3 टॉप मॉडेल वर मिळत आहे धमाकेदार डील्स!

Flipkart Big Saving Days चा शेवटचा दिवस! ₹10,000 च्या आत मिळणारे POCO, Realme आणि Infinix चे जबरदस्त 5G फोन मोठ्या सूटसह खरेदी करा.

On:
Follow Us

Flipkart वर सुरू असलेल्या Big Saving Days Sale चा आज शेवटचा दिवस असून, तुम्ही स्वस्त दरात दमदार 5G स्मार्टफोन्स घेण्याचा विचार करत असाल, तर ही संधी गमावू नका. या सेलमध्ये ₹10,000 च्या आत मिळणाऱ्या टॉप 3 स्मार्टफोन्सवर भारी सूट, बँक ऑफर आणि आकर्षक एक्सचेंज बोनस दिला जात आहे.

या डिव्हाइसेसवर बँक कार्ड वापरून cashback ही मिळतो. लक्षात ठेवा की exchange offer मध्ये मिळणारा अ‍ॅडिशनल डिस्काउंट तुमच्या जुन्या फोनच्या स्थितीवर, ब्रँडवर आणि कंपनीच्या एक्सचेंज पॉलिसीवर अवलंबून असेल. या यादीत POCO, Realme आणि Infinix ब्रँड्सचे स्मार्टफोन्स समाविष्ट आहेत. चला पाहूया या धमाकेदार डील्सची संपूर्ण माहिती.

POCO C75 5G

या फोनमध्ये 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज मिळते. याची किंमत फक्त ₹7,999 आहे. जर तुम्ही Flipkart Axis Bank कार्ड वापरून पेमेंट केले, तर तुम्हाला 5% cashback मिळतो. Exchange Bonus वापरल्यास या फोनची किंमत तुम्ही ₹6,350 पर्यंत कमी करू शकता. POCO C75 5G मध्ये 6.88 इंचाचा डिस्प्ले असून तो 120Hz refresh rate ला सपोर्ट करतो. फोनमध्ये 50MP चा मेन कॅमेरा दिला आहे. प्रोसेसर म्हणून यात Snapdragon 4s Gen 2 चा वापर करण्यात आला आहे.

Realme C63 5G

या फोनमध्ये 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज मिळते. Flipkart वर याची किंमत ₹10,999 असून, बँक ऑफर अंतर्गत ₹1,000 ची सूट मिळते. त्यामुळे हा फोन तुम्हाला ₹9,999 मध्ये मिळू शकतो. Flipkart Axis Bank कार्ड वापरल्यास 5% cashback ही मिळतो.

Realme C63 5G वर कंपनी ₹8,900 पर्यंतचा exchange bonus देखील देते. या फोनमध्ये 6.67 इंचाचा HD+ डिस्प्ले असून तो 120Hz refresh rate ला सपोर्ट करतो. हा फोन Dimensity 6300 processor वर चालतो. याचा मेन कॅमेरा 32MP तर सेल्फी कॅमेरा 8MP चा आहे.

Infinix SMART 9 HD

3GB रॅम आणि 64GB स्टोरेजसह येणाऱ्या या फोनची किंमत ₹6,699 आहे. Flipkart Axis Bank कार्ड वापरून खरेदी केल्यास 5% cashback मिळतो. Exchange offer अंतर्गत तुम्हाला ₹5,200 पर्यंतचा फायदा होऊ शकतो. या फोनमध्ये 6.7 इंचाचा HD+ डिस्प्ले दिला आहे. यामध्ये 5000mAh ची दमदार battery आहे. 13MP मेन कॅमेरा आणि Helio G50 chipset या फोनमध्ये देण्यात आला आहे.

Mahesh Bhosale

Hey, it's me, Mahesh. I'm a Marathi content writer with over two years of experience. I'm an expert in writing Marathi content on technology and automobiles for the MarathiGold.com

For Feedback - [email protected]
Join Our WhatsApp Channel