Samsung चा सर्वात पातळ स्मार्टफोन Galaxy S25 Edge चर्चेत राहिला आहे. हा फोन ग्राहकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण करत आहे. त्यामुळे या फोनच्या लॉन्च डेटबाबत सतत चर्चेला उधाण आले आहे. आधीच्या लीक रिपोर्ट्सनुसार, हा फोन 15 एप्रिल रोजी लॉन्च होणार होता.
मात्र, आता ही तारीख बदलण्यात आली आहे. नव्या माहितीनुसार, Samsung Galaxy S25 Edge चा लॉन्च 13 मे रोजी होणार आहे. या लॉन्चला झालेल्या विलंबामागील संभाव्य कारण म्हणजे Samsung चे सह-सीईओ हान जोंग-ही यांचे निधन असू शकते.
Samsung Galaxy S25 Edge ची लॉन्च डेट लीक
SamMobile च्या अहवालानुसार, Samsung आता 13 मे रोजी Galaxy S25 Edge लॉन्च करण्याची योजना आखत आहे. मात्र, हा एक मोठा इव्हेंट नसेल. रिपोर्टनुसार, हा फोन केवळ एका छोट्या प्रेझेंटेशनसह लॉन्च केला जाऊ शकतो.
याशिवाय, या फोनच्या विक्रीबाबत (Sale Date) अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे इच्छुक ग्राहकांना Samsung Galaxy S25 Edge खरेदी करण्यासाठी थोडी अधिक प्रतीक्षा करावी लागेल.
Samsung Galaxy S25 Edge चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
डिझाइनबाबत बोलायचे झाल्यास, Galaxy S25 Edge चा बॅक लूक हा iPhone 16 प्रमाणेच दिसतो. या फोनमध्ये 6.65-इंच डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट, आणि Gorilla Glass Victus 2 मिळू शकतो. याशिवाय, फोनमध्ये Snapdragon 8 Elite SoC प्रोसेसर दिला जाण्याची शक्यता आहे, जो 12GB RAM सह येऊ शकतो.
कॅमेरा: या स्मार्टफोनमध्ये 200MP प्रायमरी कॅमेरा आणि 12MP अल्ट्रावाइड कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे.
बॅटरी आणि चार्जिंग: फोनमध्ये 3,900mAh बॅटरी आणि 25W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळण्याची शक्यता आहे. हा फोन फक्त 5.84mm पातळ आणि वजन 162 ग्रॅम असेल, ज्यामुळे तो बाजारातील सर्वात पातळ फ्लॅगशिप स्मार्टफोन ठरू शकतो.















