जर तुम्ही Samsung स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक जबरदस्त डील उपलब्ध आहे, ज्यामुळे तुमचे हजारो रुपये वाचू शकतात. सध्या Samsung चा एक महागडा S-Series स्मार्टफोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर जवळपास अर्ध्या किमतीत विकला जात आहे. विशेष म्हणजे, या फोनची किंमत लॉन्चवेळी तब्बल एक लाख रुपये होती.
येथे आपण बोलतोय Samsung Galaxy S24+ या स्मार्टफोनबद्दल, जो गेल्या वर्षी लाँच झालेल्या Galaxy S24 सीरीजचा भाग आहे. आता हा फोन अनेकांच्या बजेटमध्ये बसतोय. चला पाहूया, कोणत्या प्लॅटफॉर्मवर मिळतोय हा स्वस्तात आणि यामध्ये आहे तरी काय खास…
लॉन्चवेळी होती तब्बल 1 लाख रुपये किंमत
भारतामध्ये Samsung Galaxy S24+ च्या 12GB+256GB व्हेरिएंटची किंमत लॉन्चवेळी ₹99,999 होती आणि 12GB+512GB व्हेरिएंटसाठी किंमत ₹1,09,999 होती. हा फोन Cobalt Violet आणि Onyx Black अशा दोन आकर्षक रंगांमध्ये लॉन्च करण्यात आला होता. सध्या मात्र हा स्मार्टफोन जवळपास अर्ध्या किमतीत मिळतोय.
सध्या अर्ध्या किमतीत मिळतोय Galaxy S24+
Flipkart वर Galaxy S24+ चा 12GB+256GB व्हेरिएंट केवळ ₹54,999 मध्ये लिस्ट करण्यात आला आहे. यामध्ये दोन्ही कलर व्हेरिएंट्स उपलब्ध आहेत. याशिवाय, Flipkart Axis Bank Credit Card वापरून खरेदी केल्यास ₹2,750 पर्यंत अतिरिक्त सूट मिळते, ज्यामुळे या फोनची प्रभावी किंमत फक्त ₹52,249 होते. म्हणजे जवळपास 1 लाखाचा फोन तब्बल ₹47,750 कमी किमतीत खरेदी करता येतोय.
याशिवाय, exchange bonus देखील उपलब्ध आहे, ज्याचा फायदा घेऊन किंमत आणखी कमी करता येऊ शकते. (टीप – एक्सचेंज बोनसची किंमत जुन्या फोनच्या स्थितीवर, ब्रँड आणि मॉडेलवर अवलंबून असेल.)
जाणून घ्या फोनमध्ये काय आहे खास
Galaxy S24+ मध्ये 6.7 इंचाचा Quad-HD+ डिस्प्ले आहे, ज्याचा refresh rate 120Hz पर्यंत आहे. या फोनमध्ये Exynos 2400 processor देण्यात आला आहे, जो 12GB RAM आणि 512GB स्टोरेजपर्यंतच्या कॉन्फिगरेशनसोबत येतो. फोटोग्राफीसाठी, यामध्ये f/1.8 अपर्चर असलेला 50MP चा वाइड-एंगल कॅमेरा, f/2.2 अपर्चरसह 12MP चा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि f/2.4 अपर्चरसह 10MP चा 3x ऑप्टिकल झूम टेलीफोटो कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी, यामध्ये 12MP चा फ्रंट कॅमेरा आहे.
फोनमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 6E, Bluetooth v5.3, GPS, NFC आणि USB Type-C पोर्ट यांसारखे कनेक्टिव्हिटी पर्याय आहेत. फोनमध्ये 45W wired charging सपोर्टसह 4900mAh ची बॅटरी आहे. IP68 रेटिंग असल्यामुळे हा फोन पाण्यापासून आणि धुळीपासून सुरक्षित आहे. याचे वजन 196 ग्रॅम असून डायमेंशन 158.5×75.9×7.7 मिमी आहे.