Samsung भारतात लवकरच एक जबरदस्त स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. कंपनीने आज Amazon द्वारे Samsung Galaxy M56 5G स्मार्टफोनच्या लॉन्च डेटची अधिकृत घोषणा केली आहे. गॅलेक्सी M56 5G च्या लाँचसाठी कंपनी पूर्णपणे सज्ज झाली आहे.
Amazon वर या फोनसाठी एक खास मायक्रोसाईट (Microsite) देखील सुरू करण्यात आली आहे, जी या अपकमिंग स्मार्टफोनची स्पेसिफिकेशन्स आणि उपलब्धतेबाबत माहिती देते. चला तर मग जाणून घेऊया Samsung Galaxy M56 5G बद्दल सविस्तर.
भारतात Samsung Galaxy M56 5G कधी होणार लॉन्च?
Samsung Galaxy M56 5G भारतात 17 एप्रिल रोजी अधिकृतपणे लॉन्च होणार आहे. लॉन्चनंतर हा फोन Amazon वरून खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे. याच दिवशी फोनसाठी सेलची तारीख आणि ऑफर्सची माहितीही उघड केली जाईल. हा फोन मागील वर्षी आलेल्या Galaxy M55 चा अपग्रेडेड व्हर्जन म्हणजेच उत्तराधिकारी असेल.
Samsung Galaxy M56 5G चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स
Samsung Galaxy M56 5G हा कंपनीचा आत्तापर्यंतचा सर्वात स्लिम फोन (Slim Phone) असेल, ज्याची जाडी फक्त 7.2 मिमी असल्याचे कंफर्म झाले आहे. हा फोन Galaxy M55 पेक्षा 30% पातळ आहे आणि त्याचे वजन 180 ग्रॅम इतके असेल.
या फोनमध्ये पुढील आणि मागील बाजूस Corning Gorilla Glass Victus+ प्रोटेक्शन दिले गेले आहे. Galaxy M55 च्या तुलनेत, हा नवीन फोन 36% पातळ बेजल्स आणि 33% अधिक ब्राइट असलेल्या Super AMOLED+ स्क्रीनसह येतो.
कॅमेराबाबत सांगायचे झाल्यास, Galaxy M56 5G मध्ये OIS सह 50MP मुख्य कॅमेरा, 8MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा, आणि 2MP मॅक्रो कॅमेरा असलेले Triple Camera System असेल. सेल्फीसाठी, हा फोन 10-bit HDR व्हिडिओ रेकॉर्डिंग सपोर्ट करणारा 12MP फ्रंट कॅमेरा घेऊन येईल.
फोनमध्ये AI-पावर्ड एडिटिंग फीचर, Big Pixel टेक्नॉलॉजी, Low Noise Mode आणि AI ISP यांसारखे अत्याधुनिक कॅमेरा फीचर्स असणार आहेत.
जरी Amazon लिस्टिंगमध्ये प्रोसेसरबाबत माहिती दिली गेली नाही, तरी Galaxy M56 5G आधीच Geekbench Benchmark Platform वर लिस्ट झाला आहे, ज्यावरून हा फोन Exynos 1480 SoC प्रोसेसरसह येण्याची शक्यता आहे. त्याच लिस्टिंगमधून हेही स्पष्ट झाले आहे की, फोन Android 15 OS आणि 8GB RAM सह येईल. मात्र, फोनच्या बॅटरी आणि चार्जिंग स्पीड बाबत अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही.