Samsung चा आणखी एक जबरदस्त स्मार्टफोन लॉन्चच्या तयारीत, Galaxy F56 ची किंमत लॉन्चपूर्वीच लीक

Samsung लवकरच Galaxy F56 स्मार्टफोन भारतात लॉन्च करणार असून याची किंमत लॉन्चपूर्वीच लीक झाली आहे. जाणून घ्या Galaxy F56 चे संभाव्य व्हेरिएंट, किंमत आणि Galaxy M56 5G चे स्पेसिफिकेशन्स.

On:
Follow Us

Samsung आपल्या लोकप्रिय Galaxy F Series मध्ये आणखी एक नवीन आणि दमदार स्मार्टफोन सादर करण्याच्या तयारीत आहे. कंपनी लवकरच Galaxy F56 भारतात लाँच करणार असून, अद्याप याची अधिकृत लॉन्च तारीख समोर आलेली नाही. मात्र, लॉन्चपूर्वीच या स्मार्टफोनची किंमत (Price) लीक झाली आहे.

टिपस्टर Abhishek Yadav यांच्या माहितीनुसार, Galaxy F56 दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध होणार आहे – 8GB + 128GB आणि 8GB + 256GB. लीक रिपोर्टनुसार, 128GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत ₹27,999 असू शकते, तर 256GB स्टोरेज व्हेरिएंट ₹30,999 मध्ये उपलब्ध होणार आहे.

काही आठवड्यांपूर्वी Galaxy F56 5G चा सपोर्ट पेज Samsung India च्या अधिकृत वेबसाईटवर पाहायला मिळाला होता. या फोनचा मॉडेल नंबर SM-E566B/DS असा असून सपोर्ट पेज अ‍ॅक्टिव्ह झाल्यामुळे त्याचा लॉन्च फार लांब नसल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. याशिवाय, या डिव्हाइसला BIS (Bureau of Indian Standards) आणि Bluetooth SIG प्लॅटफॉर्मवर देखील स्पॉट करण्यात आले आहे.

Galaxy F56 चे काही फीचर्स मागच्या महिन्यात लॉन्च झालेल्या Galaxy M56 प्रमाणे असू शकतात. तरीदेखील, यासंदर्भात कंपनीकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. तोपर्यंत, Galaxy M56 5G मध्ये कंपनीने काय वैशिष्ट्ये दिली आहेत, ते पाहूया.

Galaxy M56 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy M56 5G मागील महिन्यात भारतात सादर करण्यात आला होता. हा स्मार्टफोन 8GB RAM आणि 256GB पर्यंत स्टोरेज (Internal Storage) सह येतो. याची प्रारंभिक किंमत ₹27,999 आहे.

फोनमध्ये 6.73-इंचाचा Full HD+ sAMOLED+ डिस्प्ले असून त्याचा रिझोल्यूशन 1080 x 2340 pixels आहे. या डिव्हाइसला Exynos 1480 चिपसेट सपोर्ट करतो.

फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये LED फ्लॅशसह ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामध्ये 50MP मेन लेंस, 8MP अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा, आणि 2MP मॅक्रो कॅमेरा आहे. सेल्फीच्या प्रेमींसाठी यामध्ये 12MP फ्रंट कॅमेरा दिला आहे.

Galaxy M56 मध्ये 5000mAh बॅटरी दिली असून ती 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. ऑपरेटिंग सिस्टिम म्हणून हा फोन Android 15 वर आधारित OneUI 7 वर चालतो.

Mahesh Bhosale

Hey, it's me, Mahesh. I'm a Marathi content writer with over two years of experience. I'm an expert in writing Marathi content on technology and automobiles for the MarathiGold.com

For Feedback - [email protected]
Join Our WhatsApp Channel