50MP मुख्य कॅमेरा असलेला Samsung चा नवीन 5G स्मार्टफोन, स्वस्तात खरेदीची संधी

Samsung ने Galaxy A26 5G भारतात लॉन्च केला आहे. 50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी आणि 120Hz डिस्प्ले असलेला हा मार्टफोन सवलतीसह उपलब्ध आहे. किंमत आणि फीचर्स जाणून घ्या.

On:
Follow Us

Samsung ने आपल्या Galaxy A सिरीजमधील नवीन स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. या डिव्हाइसचे नाव Samsung Galaxy A26 5G असे आहे. फोन 8GB+128GB आणि 8GB+256GB वेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत ₹24,999 असून 256GB स्टोरेज वेरिएंटसाठी ₹27,999 मोजावे लागतील.

लॉन्च ऑफर अंतर्गत फोनवर ₹2,000 चा बँक डिस्काउंट मिळत आहे. हा डिस्काउंट मिळवण्यासाठी HDFC किंवा SBI च्या क्रेडिट कार्डने पेमेंट करावे लागेल.

फोन Awesome Black, Awesome Mint, Awesome White आणि Awesome Peach या चार रंगांमध्ये उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन Flipkart, Samsung India आणि ऑफलाइन रिटेल स्टोअर्सवर खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे.

Samsung च्या या नवीन 5G फोनमध्ये 50MP मुख्य कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी यांसारखे दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. चला, या स्मार्टफोनचे फिचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया.

Samsung Galaxy A26 5G चे फिचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

या फोनमध्ये 1080 x 2340 पिक्सेल रिझोल्यूशन असलेला 6.7-इंच Full HD+ Infinity-U Super AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट करतो. डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी यात Gorilla Glass Victus+ देण्यात आला आहे. फोनमध्ये 8GB RAM आणि 256GB पर्यंतचा इंटरनल स्टोरेज पर्याय उपलब्ध आहे. प्रोसेसर म्हणून यात Exynos 1380 चिपसेट देण्यात आला आहे.

फोटोग्राफीसाठी फोनच्या बॅक पॅनलवर LED फ्लॅशसह तीन कॅमेरे आहेत. यामध्ये 50MP मुख्य लेन्स (OIS – Optical Image Stabilization सपोर्टसह), 8MP अल्ट्रावाइड अँगल कॅमेरा आणि 2MP मॅक्रो कॅमेरा यांचा समावेश आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 13MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Samsung च्या या स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी असून ती 25W फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. बायोमेट्रिक सिक्युरिटीसाठी यात साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. हा फोन IP67 डस्ट आणि वॉटर रेझिस्टंट रेटिंग सह येतो.

ऑपरेटिंग सिस्टमबद्दल बोलायचे झाल्यास, हा स्मार्टफोन Android 15 वर आधारित Samsung One UI 7 वर चालतो. कंपनी या फोनला 6 OS अपग्रेड्स आणि 6 वर्षे सिक्युरिटी अपडेट्स देणार आहे.

Mahesh Bhosale

Hey, it's me, Mahesh. I'm a Marathi content writer with over two years of experience. I'm an expert in writing Marathi content on technology and automobiles for the MarathiGold.com

For Feedback - [email protected]
Join Our WhatsApp Channel