पहिल्याच सेलमध्ये Redmi Watch Move बनली सर्वाधिक विक्री होणारी स्मार्टवॉच, किंमत अवघी इतकी!

पहिल्याच सेलमध्ये सर्व युनिट्स विकली गेलेली Redmi Watch Move ही ₹1,999 किंमतीत लॉन्च झालेली स्मार्टवॉच आहे, जी Flipkart वर सर्वाधिक विक्री होणारी स्मार्टवॉच ठरली आहे. जाणून घ्या तिची वैशिष्ट्ये, बॅटरी लाइफ आणि डिझाईन!

On:
Follow Us

Redmi Watch Move स्मार्टवॉचने विक्रीच्या बाबतीत नवा इतिहास रचला आहे. पहिल्याच सेलमध्ये ग्राहकांनी या वॉचसाठी अक्षरशः झुंबड उडवली आणि काही मिनिटांतच सर्व युनिट्स विकले गेले. ग्राहकांचा हा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून कंपनीही चकित झाली आहे.

कंपनीने X वर ही माहिती शेअर करत सांगितले की, Redmi Watch Move ही Flipkart वर सर्वाधिक विक्री होणारी स्मार्टवॉच ठरली आहे. फक्त 10 मिनिटांत या वॉचचे 1000 हून अधिक युनिट्स विकले गेले, असेही कंपनीने स्पष्ट केले. ही स्मार्टवॉच भारतात काही दिवसांपूर्वीच लॉन्च झाली होती आणि 1 मे रोजी पहिला सेल पार पडला.

ही स्मार्टवॉच रेक्टँग्युलर AMOLED डिस्प्ले आणि फंक्शनल रोटेटिंग क्राउनसह सादर करण्यात आली आहे. यात अनेक हेल्थ आणि वेलनेस मॉनिटरिंग फीचर्सचा समावेश आहे. कंपनीचा दावा आहे की, ही वॉच 98.5 टक्के अचूक ट्रॅकिंग करते.

ही शाओमीच्या HyperOS यूजर इंटरफेसवर चालते आणि यामध्ये हिंदी भाषा सपोर्ट देखील मिळतो. कंपनीचा आणखी एक दावा असा आहे की, पूर्ण चार्जमध्ये ही वॉच 14 दिवसांची battery life देते. चला जाणून घेऊया तिची किंमत आणि वैशिष्ट्ये सविस्तर…

Redmi Watch Move ची भारतातील किंमत

भारतामध्ये Redmi Watch Move ची किंमत फक्त ₹1,999 ठेवण्यात आली आहे. ही वॉच Flipkart, Xiaomi India वेबसाइट आणि Xiaomi रिटेल स्टोअर्सवर उपलब्ध आहे. 1 मे रोजी झालेल्या पहिल्याच सेलमध्ये या वॉचने Flipkart वर सर्वाधिक विक्री होणाऱ्या स्मार्टवॉचचा किताब पटकावला. ही वॉच Blue Blaze, Black Drift, Gold Rush आणि Silver Sprint या आकर्षक रंगांमध्ये सादर करण्यात आली आहे.

Redmi Watch Move ची वैशिष्ट्ये

Redmi Watch Move मध्ये 1.85 इंच रेक्टँग्युलर 2.5D कर्व्हड AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रिझोल्यूशन 390×450 पिक्सेल आहे. या डिस्प्लेला 60Hz रिफ्रेश रेट, 600 निट्स ब्राइटनेस, 322ppi पिक्सेल डेनसिटी, 74 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशियो आणि Always-On Display सपोर्ट मिळतो. यात 140 हून अधिक प्रीसेट sports modes आहेत आणि ही वॉच heart rate, blood oxygen level (SpO₂), stress level, sleep cycle, आणि menstrual cycle tracker यांसारख्या हेल्थ फीचर्ससह सुसज्ज आहे.

ही वॉच HyperOS वर कार्यरत असून notes, tasks, calendar events आणि real-time weather updates साठी सिंक करते. यामध्ये Bluetooth calling आणि हिंदी भाषेचा सपोर्ट देखील आहे. ही वॉच Android, iOS डिव्हाइसेस तसेच Mi Fitness App सह सुसंगत आहे. App च्या माध्यमातून यूजर्स वॉचमध्ये 10 कॉन्टॅक्ट्स सेव्ह करू शकतात. यामधील spinning crown वापरून वापरकर्ता एका बोटाने अ‍ॅप्स व अलर्ट्स स्क्रोल करू शकतो. वॉचमध्ये अँटी-अ‍ॅलर्जीक TPU strap आणि IP68 डस्ट व वॉटर रेसिस्टंट रेटिंग आहे.

ही वॉच 300mAh बॅटरीसह येते. कंपनीच्या मते, सामान्य वापरात वॉच 14 दिवसांची battery backup देते. जास्त वापरासह ही 10 दिवस चालते आणि Always-On Display चालू असल्यास 5 दिवस टिकते. यात ‘Ultra’ बॅटरी सेव्हर मोडही आहे. केवळ 25 ग्रॅम वजन असलेली ही वॉच 45.5×38.9×10.8 मिमी डायमेन्शनसह येते.

Mahesh Bhosale

Hey, it's me, Mahesh. I'm a Marathi content writer with over two years of experience. I'm an expert in writing Marathi content on technology and automobiles for the MarathiGold.com

For Feedback - [email protected]
Join Our WhatsApp Channel