जाणून घ्या या Redmi A5 4G बजेट स्मार्टफोनची किंमत, इमेज आणि स्पेसिफिकेशन्स

Redmi A5 4G स्मार्टफोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स लीक! जाणून घ्या या बजेट फोनमध्ये काय खास असेल.

On:
Follow Us

Redmi A4 5G हा Snapdragon 4s Gen 2 प्रोसेसरसह येणारा पहिला स्मार्टफोन म्हणून नोव्हेंबर 2024 मध्ये भारतात लाँच करण्यात आला होता. काही दिवसांपूर्वीच या फोनचा नेक्स्ट जनरेशन मॉडल Redmi A5 5G सर्टिफिकेशन साइटवर दिसला होता.

आता Redmi A4 4G स्मार्टफोनच्या किंमतीसह त्याच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती इंटरनेटवर लीक झाली आहे. यामध्ये फोनचे डिटेल्स तसेच युरोपियन प्राइस देखील समोर आली आहे.

Redmi A4 4G किंमत (लीक)

लीकनुसार, Redmi A4 4G स्मार्टफोनचा 4GB RAM आणि 128GB स्टोरेज असलेला मॉडल समोर आला आहे. या मोबाईलची ग्लोबल किंमत 149 युरो सांगितली जात आहे, जी भारतीय चलनानुसार जवळपास ₹13,750 होईल. मात्र, युरोपियन मार्केटमध्ये फोनचे दर भारताच्या तुलनेत अधिक असतात. त्यामुळे जर Redmi A4 4G भारतात लाँच झाला, तर त्याची किंमत सुमारे ₹7,000 ठेवली जाऊ शकते.

Redmi A5 4G स्पेसिफिकेशन्स (लीक)

• डिस्प्ले: लीकनुसार, Redmi A5 4G स्मार्टफोनमध्ये 6.88-इंच HD+ डिस्प्ले असेल, जो 1640 x 720 पिक्सेल रिझोल्यूशन देईल. ही LCD स्क्रीन असेल आणि 120Hz रिफ्रेश रेट तसेच 1500nits ब्राइटनेस सपोर्ट करेल.

• प्रोसेसर: Redmi A5 4G मध्ये Unisoc T7250 चिपसेट देण्यात येऊ शकतो. हा 12nm आर्किटेक्चरवर आधारित 8-कोर CPU आहे, ज्यामध्ये 1.6GHz क्लॉक स्पीड असलेले सहा Cortex-A55 कोर आणि 1.8GHz क्लॉक स्पीड असलेले दोन Cortex-A75 कोर असतील.

• OS: हा स्मार्टफोन Android 15 (Go Edition) वर कार्यरत असेल. Android Go Edition असल्यामुळे यामध्ये Google Go Apps इंस्टॉल व डाऊनलोड करता येतील, ज्या कमी स्टोरेज वापरतात, कमी इंटरनेट डेटा खर्च करतात आणि कमी बॅटरी वापरतात.

• कॅमेरा: Redmi A5 4G मध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. लीकनुसार, यात 32MP मुख्य कॅमेरा आणि 8MP फ्रंट कॅमेरा सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी दिला जाईल.

• बॅटरी: पॉवर बॅकअपसाठी Redmi A5 4G मध्ये 5,200mAh बॅटरी दिली जाणार असून, 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळू शकतो.

• अन्य फीचर्स: लीकनुसार, Redmi A5 4G मध्ये Bluetooth 5.2, USB Type-C पोर्ट आणि 3.5mm हेडफोन जॅक दिला जाईल. सिक्युरिटीसाठी साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर असणार आहे. या फोनचे वजन 193 ग्रॅम असेल, तर त्याचे डायमेंशन 171.7 x 77.8 x 8.26mm असेल.

Mahesh Bhosale

Hey, it's me, Mahesh. I'm a Marathi content writer with over two years of experience. I'm an expert in writing Marathi content on technology and automobiles for the MarathiGold.com

For Feedback - [email protected]
Join Our WhatsApp Channel