realme कंपनीने आपल्या ‘14’ नंबर सिरीजअंतर्गत आतापर्यंत realme 14x, 14 Pro, realme 14 Pro+ आणि 14 Pro Lite हे चार 5G स्मार्टफोन भारतीय बाजारात सादर केले आहेत. आता या सिरीजमध्ये आणखी एक नवा फोन जोडला जाणार आहे. कंपनीने जाहीर केले आहे की, realme 14T 5G हा स्मार्टफोन या महिन्यात भारतात लॉन्च होणार आहे. पुढे तुम्ही या फोनबाबत सविस्तर माहिती पाहू शकता.
realme 14T 5G भारतात लॉन्च कधी होणार?
realme 14T 5G हा स्मार्टफोन भारतात 25 एप्रिल रोजी लॉन्च होणार आहे. हा फोन कंपनी Virtual Event द्वारे सादर करणार असून, दुपारी 12 वाजता याचे price आणि sale details उघड केले जातील. realme च्या अधिकृत वेबसाइटसह सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा लॉन्च इव्हेंट Live Stream केला जाईल. तसेच Flipkart या ई-कॉमर्स साइटवरही या फोनचा प्रोडक्ट पेज Live झाला आहे आणि तिथेही याचे लॉन्च थेट पाहता येईल.
realme 14T 5G चे स्पेसिफिकेशन्स
हा नवीन realme 5G फोन तब्बल 6,000mAh Battery सह सादर केला जाणार आहे. कंपनीचा दावा आहे की, एकदा फुल चार्ज केल्यानंतर या फोनवर तब्बल 17.2 तास YouTube किंवा 12.5 तास Instagram वापरता येऊ शकतो. एवढी मोठी बॅटरी जलद चार्जिंगसाठी या फोनमध्ये 45W Fast Charging तंत्रज्ञान दिले गेले आहे.
realme 14T 5G मध्ये AMOLED Display दिले जाईल, ज्यामध्ये Punch-Hole Style Flat Screen असेल. या डिस्प्लेला 2100nits Peak Brightness सपोर्ट मिळतो. तसेच या स्क्रीनला TÜV Rheinland Certification प्राप्त झाले आहे, ज्यामुळे रात्री फोन वापरताना डोळ्यांना त्रास होणार नाही. कंपनीनुसार या मोबाईलची जाडी फक्त 7.97mm असेल.
फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये Dual Rear Camera सेटअप दिला जाणार आहे. यात LED Flash सहित 50MP मुख्य सेंसर असेल, जो AI फीचर्स ने सुसज्ज असेल. विशेष म्हणजे, हा स्मार्टफोन IP69 Rating सह येतो, ज्यामुळे तो पाण्यातून आणि धुळीतून सुरक्षित राहतो.
यामध्ये 300% Ultra Volume Mode देखील देण्यात आला आहे. realme 14T 5G स्मार्टफोन Silken Green, Violet Grace आणि Satin Ink या तीन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध असेल.