स्मार्टफोन (Smartphone) विश्वात Realme ने पुन्हा एकदा धक्का देणारी घोषणा केली आहे. कंपनीने 10000mAh क्षमतेच्या बॅटरीसह आपला नवा कॉन्सेप्ट फोन (Concept Phone) सादर केला आहे. या फोनची टॅगलाइन ‘Power That Never Stops’ अशी असून, सतत बॅटरी संपण्याची आणि वारंवार चार्जिंगची झंझट दूर करण्याचे आश्वासन तो देतो.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, एवढी शक्तिशाली बॅटरी असूनही या फोनचे डिझाइन खूपच स्लिम आणि लाइटवेट आहे. केवळ 8.5mm इतकी स्लिम प्रोफाईल आणि 200 ग्रॅम वजन असलेला हा फोन वापरण्यास अतिशय आरामदायक ठरेल. यामध्ये Ultra-high Silicon Content Anode Battery वापरण्यात आली आहे.
जगातील सर्वात पातळ Android मेनबोर्ड या फोनमध्ये
या फोनमध्ये 10% सिलिकॉन रेशियो (जो स्मार्टफोन इंडस्ट्रीमधील सर्वाधिक आहे) आणि 887Wh/L एनर्जी डेंसिटी देण्यात आली आहे. हे कॉम्बिनेशन Lithium-ion battery performance साठी नवे मापदंड निश्चित करते. 10000mAh बॅटरी बसवण्यासाठी कंपनीने डिझाइनमध्ये खूप मेहनत घेतली आहे.
या कॉन्सेप्ट फोनसाठी Realme ने Mini Diamond Architecture नावाचे नवे इंटरनल लेआउट तयार केले आहे. यामुळे या फोनमध्ये जगातील सर्वात पातळ Android Mainboard बसवणे शक्य झाले आहे, जो फक्त 23.4mm आहे. इतकंच नाही तर, या डिझाइनसाठी कंपनीला जगभरात 60 पेक्षा अधिक patents मिळाले आहेत.
याच महिन्यात होणार शोकेस
या कॉन्सेप्ट फोनच्या retail box वर GT 10000mAh लिहिलेले आहे. त्यावर AI असा उल्लेख देखील असून, यावरून हा फोन AI features ने सुसज्ज असेल हे स्पष्ट होते. Realme ने शेअर केलेल्या फोटोमध्ये फोनचा रियर लुक दिसून येतो, ज्यामध्ये ‘Power That Never Stops’ ही टॅगलाइन आणि मोठ्या फॉन्टमध्ये 10000mAh असे बॅक पॅनलवर छापलेले दिसते.
फोटो पाहता हेही स्पष्ट होते की, Realme ने या फोनमध्ये LED Flash सह दोन कॅमेरे दिले आहेत. कंपनी याच महिन्याच्या शेवटी Realme GT 7 series साठी ग्लोबल लॉन्च इव्हेंट आयोजित करू शकते. अशा कयास लावले जात आहेत की, ह्याच इव्हेंटमध्ये Realme GT 10000mAh concept phone चे प्रदर्शन केले जाईल. मात्र, ह्या फोनच्या commercial sale बद्दल कंपनीने अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती दिलेली नाही.