OPPO K13 भारतात 21 एप्रिल रोजी लॉन्च होणार आहे. कंपनीने फोनची लॉन्च डेट जाहीर करताच त्याचे फोटो, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्ससुद्धा उघड केले आहेत. भारतीय बाजारात या फोनच्या एंट्रीआधीच आता बातमी समोर आली आहे की कंपनी ‘K13’ सिरीजअंतर्गत आणखी एक नवीन 5G मोबाईल OPPO K13x घेऊन येणार आहे जो चीनमध्ये लॉन्च केला जाणार आहे. या आगामी ओप्पो K13x ची माहिती इंटरनेटवर लीक झाली आहे, जी तुम्ही पुढे वाचू शकता.
OPPO K13x 5G लीक डिटेल्स
ओप्पो K13x 5G फोनची माहिती प्रसिद्ध परदेशी टिपस्टर Digital Chat Station द्वारे समोर आली आहे. लीकमध्ये असा दावा करण्यात आला आहे की ओप्पो आपल्या होम मार्केटमध्ये एक नवीन स्मार्टफोन सादर करण्याच्या तयारीत आहे, ज्याचे नाव OPPO K13x असू शकते. या फोनसाठी “king of battery life” ही टॅगलाईन वापरली जाऊ शकते, जी त्याच्या मोठ्या बॅटरी क्षमतेचे सूचक आहे.
लीकमध्ये दिलेल्या माहितीनुसार, हा अपकमिंग Oppo 5G फोन 7,000mAh battery सह बाजारात आणला जाऊ शकतो. तसेच, या मोठ्या बॅटरीला झपाट्याने चार्ज करण्यासाठी फोनमध्ये 80W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी दिली जाऊ शकते. यात single-cell graphite material वापरण्यात येईल, जो उत्कृष्ट power efficiency देईल.
OPPO K13x 5G फोनच्या इतर स्पेसिफिकेशन्सबद्दल सांगायचं झालं तर, लीकनुसार यात Snapdragon chipset मिळू शकतो. मोबाईल गेमिंगसाठी या फोनमध्ये 5700mm² VC cooling system दिला जाऊ शकतो. लीकमध्ये नमूद करण्यात आलं आहे की K13x 5G मध्ये NFC, infrared आणि dual speakers यासारखे फीचर्सही पाहायला मिळू शकतात. सध्या ओप्पोने या K13x 5G फोनबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही, मात्र पुढील आठवड्यात भारतात लॉन्च होणाऱ्या OPPO K13 बाबतची माहिती पुढे दिली आहे.
OPPO K13 5G इंडिया लॉन्च डिटेल्स
ओप्पो कंपनी येत्या 21 एप्रिल रोजी भारतात एक भव्य इव्हेंट आयोजित करणार आहे, जिथे नवीन 5G फोन OPPO K13 लॉन्च केला जाईल. हा लॉन्च इव्हेंट दुपारी 12 वाजता सुरू होईल आणि तो कंपनीच्या वेबसाइटवर तसेच सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर लाईव्ह पाहता येणार आहे. विशेष बाब म्हणजे, ओप्पो K13 अद्याप कोणत्याही आंतरराष्ट्रीय बाजारात सादर करण्यात आलेला नाही. त्यामुळे 21 एप्रिलचा India Launch हा त्याचा Global Debut मानला जाऊ शकतो. याच दिवशी OPPO K13 5G चे किंमत व सेल डिटेल्सही जाहीर केल्या जातील.
OPPO K13 5G स्पेसिफिकेशन्स
कंपनीने याआधीच स्पष्ट केलं आहे की OPPO K13 5G फोन 7,000mAh battery सह सादर होणार आहे, ज्यामध्ये 80W fast charging टेक्नॉलॉजी मिळेल. कंपनीचा दावा आहे की फुल चार्जनंतर या फोनवर 10.3 तास सलग मोबाईल गेम खेळता येऊ शकतात. तसंच, बॅटरी फक्त 30 मिनिटांत 62% पर्यंत चार्ज होऊ शकते. उत्तम thermal management साठी या ओप्पो फोनमध्ये 6,000mm² graphite sheet आणि 5,700mm² vapor cooling chamber मिळेल.
OPPO K13 5G मध्ये 6.66-इंच FullHD+ AMOLED डिस्प्ले मिळणार आहे, ज्यामध्ये 120Hz refresh rate, 1200nits peak brightness आणि in-display fingerprint sensor असेल. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 50MP dual rear camera दिला जाईल. OPPO K13 5G ला IP65 rating मिळेल आणि यात IR blaster सुद्धा दिला जाईल.