OPPO K13 5G Launch: नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर OPPO K13 5G या शानदार फोनकडे तुमचं लक्ष वेधलं जाऊ शकतं. OPPO भारतात हा नवा फोन 21 एप्रिल रोजी लॉन्च करत आहे. लॉन्चपूर्वीच कंपनीने Flipkart वर याच्या फीचर्सचा खुलासा करणारी मायक्रोसाइट लाईव्ह केली आहे, जिथे या फोनबाबत अनेक महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत.
हा फोन 21 एप्रिल रोजी भारतात अधिकृतपणे लॉन्च होईल आणि OPPO India च्या अधिकृत वेबसाइटसोबतच Flipkart वरूनही खरेदी करता येईल. कंपनीने हे देखील स्पष्ट केलं आहे की हा फोन Prism Black आणि Icy Purple या दोन आकर्षक रंगांमध्ये बाजारात येईल. याची अचूक किंमत लॉन्चवेळी उघड होईल, मात्र अंदाजानुसार ती ₹20,000 पेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. भारतात याचे पहिले लॉन्च होईल आणि नंतर ते ग्लोबल मार्केटमध्ये येईल.
चला, जाणून घेऊया या फोनचे खास फीचर्स…
डिस्प्ले: या फोनमध्ये 6.66-इंचाचा फुल HD+ (1080×2400 pixels) AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. याला 120Hz Refresh Rate, 1200 nits Peak Brightness आणि Low Blue Light फीचरचा सपोर्ट मिळतो, ज्यामुळे डोळ्यांचे संरक्षण होते. यामध्ये Under-Display Fingerprint Sensor देखील आहे.
प्रोसेसर: उत्तम मल्टीटास्किंग आणि स्मूद परफॉर्मन्ससाठी या फोनमध्ये Snapdragon 6 Gen 4 Chipset दिला आहे, जो 4nm Process वर आधारित आहे. कंपनीचा दावा आहे की याचा AnTuTu स्कोअर 7.9 लाखांहून जास्त आहे. या चिपसेटसोबत Adreno A810 GPU दिलं असून, LPDDR4X RAM आणि UFS 3.1 Storage चा सपोर्ट सुद्धा मिळेल.
बॅटरी: या डिव्हाईसमध्ये 7000mAh Battery मिळते, जी 80W Wired Fast Charging ला सपोर्ट करते. कंपनीचा दावा आहे की ही बॅटरी 5 Years Durable Graphite Battery आहे. एका फुल चार्जमध्ये ती 49.4 तास कॉलिंग, 10.3 तास गेमिंग आणि 32.7 तास म्युझिक प्लेबॅक देते. यासोबतचा 80W SuperVOOC Charger फोनला फक्त 30 मिनिटांत 62% पर्यंत चार्ज करतो.
कॅमेरा: फोनमध्ये 50MP Ultra Clear Camera System दिला आहे, जो AI Clarity Enhancer, AI Unblur, AI Reflection Remover आणि AI Eraser सारख्या स्मार्ट AI फीचर्ससह सुसज्ज आहे.
खास वैशिष्ट्ये: या फोनमध्ये Splash Touch Support आहे आणि IP65 Rating असल्यामुळे तो पाण्यापासून आणि धुळीपासून सुरक्षित राहतो. यात Dual Stereo Speakers, Infrared Remote Control, आणि थर्मल मॅनेजमेंटसाठी 6000mm² Graphite Sheet व 5700mm² Ultra Large Cooling Vapor Chamber दिली आहे.















