Oppo कंपनी 10 एप्रिल रोजी चीनमध्ये तीन नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. यामध्ये Find X8s, X8s+ आणि X8 Ultra यांचा समावेश आहे. यातील X8 Ultra आधीच चीनच्या TENAA सर्टिफिकेशन डेटाबेसमध्ये त्याच्या स्पेसिफिकेशन्स आणि आयडी इमेजसह झळकला आहे.
आता Find X8s आणि Find X8s Plus हे दोन्ही फोनही TENAAच्या डेटाबेसमध्ये दिसून आले असून त्यांचे डिझाइन आणि वैशिष्ट्ये उघड झाली आहेत. चला जाणून घेऊया Oppo Find X8s बद्दल सविस्तर माहिती.
Oppo Find X8s चे स्पेसिफिकेशन्स (लीक माहितीवरून)
TENAA लिस्टिंगनुसार, PKT110 हा मॉडेल नंबर असलेल्या Oppo Find X8s स्मार्टफोनमध्ये 6.32-इंच OLED 1.5K डिस्प्ले असेल, ज्याचा रिझोल्यूशन 2640 x 1216 पिक्सेल आहे. या फोनमध्ये 2.36GHz ऑक्टा-कोर प्रोसेसर आणि 5,060mAh बॅटरी दिली जाईल.
मात्र कंपनीने अधिकृतरीत्या जाहीर केले आहे की या फोनमध्ये 3.73GHz MediaTek Dimensity 9400 Plus प्रोसेसर आणि 5,700mAh बॅटरी असेल जी 80W वायर्ड चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंग सपोर्ट करेल अशी अपेक्षा आहे.
Find X8s अनेक RAM आणि स्टोरेज कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध होणार असून यामध्ये 8GB, 12GB आणि 16GB RAM तसेच 256GB, 512GB आणि 1TB इंटरनल स्टोरेज पर्याय असतील. कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचं झालं तर या फोनच्या मागील बाजूस 50MP प्रायमरी कॅमेरा, आणि सेल्फीसाठी 32MP फ्रंट कॅमेरा दिला जाईल.
इतर फिचर्समध्ये इन-स्क्रीन फिंगरप्रिंट सेन्सर आणि IR ब्लास्टर यांचा समावेश असेल. हा फोन Android 15 वर आधारित ColorOS 15 वर चालेल अशी शक्यता आहे.
फोनच्या डायमेंशन्सबद्दल बोलायचं झालं तर त्याची लांबी 150.59 मिमी, रुंदी 71.82 मिमी, जाडी 7.73 मिमी आणि वजन 179 ग्रॅम असेल.
इतर लीक रिपोर्टनुसार, Find X8s च्या रिअर कॅमेरा सेटअपमध्ये OIS सपोर्ट असलेला 50MP Sony LYT-700 प्रायमरी कॅमेरा, 50MP Samsung S5KJN5 अल्ट्रा-वाइड कॅमेरा, आणि 3.5x ऑप्टिकल झूम व OIS सपोर्ट असलेला 50MP S5KJN5 पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा असेल.
याशिवाय फोनमध्ये 0809 व्हायब्रेशन मोटर, नवीन पुश-टाइप हार्डवेअर बटण, आणि IP68/IP69 रेटिंगसह डस्ट व वॉटर रेसिस्टंट बॉडी दिली जाईल अशी अपेक्षा आहे.
Oppo ने आधीच स्पष्ट केले आहे की Find X8s अनेक कॉन्फिगरेशन्समध्ये येईल, ज्यामध्ये 12GB+256GB, 12GB+512GB, 16GB+256GB, 16GB+512GB आणि 16GB+1TB स्टोरेज व्हेरिएंट्सचा समावेश असेल. कलर ऑप्शनबाबत बोलायचं झालं तर हा फोन Moonlight White, Island Blue, Cherry Blossom Pink आणि Starry Black अशा आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध होईल.