Oppo लवकरच नवा स्मार्टफोन लाँच करणार, OIS Camera असलेल्या डिव्हाइसचे फीचर्स लाँचपूर्वीच लीक

Oppo लवकरच Oppo F29 Pro हा नवा स्मार्टफोन लाँच करणार आहे. 6000mAh बॅटरी, Quad-Curved AMOLED Display, Dimensity 7300 Chipset, आणि OIS Camera असलेल्या या डिव्हाइसचे फीचर्स लाँचपूर्वीच लीक झाले आहेत. जाणून घ्या संपूर्ण माहिती!

On:
Follow Us

Oppo F29 Pro Leaks: ओप्पो लवकरच मिड-रेंज सेगमेंटमध्ये एक नवीन स्मार्टफोन सादर करणार आहे. हा फोन Oppo F29 Pro असेल. ओप्पो F29 प्रो लवकरच भारतात लाँच होऊ शकतो.

हा स्मार्टफोन BIS (Bureau of Indian Standards) सर्टिफिकेशन वेबसाइटवर CPH2705 या मॉडेल नंबरसह पाहायला मिळाला आहे. तसेच, या डिव्हाइसचे नाव Bluetooth SIG लिस्टिंगमध्ये स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, लाँचपूर्वीच या स्मार्टफोनचे अनेक महत्त्वाचे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स लीक झाले आहेत.

Oppo F29 Pro चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

Oppo F29 Pro मध्ये MediaTek Dimensity 7300 प्रोसेसर आणि LPDDR4X टाइप रॅमसह UFS 3.1 इंटरनल स्टोरेज असेल. हा स्मार्टफोन Android 15 वर आधारित ColorOS 15 ऑपरेटिंग सिस्टमवर कार्य करेल.

यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट असलेला 6.7-इंच FHD+ क्वाड-कर्व्ड AMOLED डिस्प्ले मिळणार आहे. बॅटरीबाबत सांगायचे झाल्यास, डिव्हाइसला 6000mAh बॅटरीसह 80W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल.

कॅमेरा सेटअपबाबत बोलायचे झाले तर, Oppo F29 Pro मध्ये Dual Rear Camera Setup असू शकतो. यामध्ये 50MP Primary Camera (OIS सपोर्टसह) आणि 2MP Secondary Sensor मिळेल. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी यात 16MP Front Camera दिला जाईल.

याशिवाय, स्मार्टफोनला स्प्लॅश आणि डस्ट रेसिस्टन्स साठी ड्युअल किंवा ट्रिपल सर्टिफिकेशन मिळण्याची शक्यता आहे. काही रिपोर्टनुसार, हा फोन अलीकडेच लाँच झालेल्या Oppo A5 Pro 5G प्रमाणेच असू शकतो. जर तसे झाले, तर या डिव्हाइसची किंमत सुमारे ₹25,000 असण्याची शक्यता आहे.

Mahesh Bhosale

Hey, it's me, Mahesh. I'm a Marathi content writer with over two years of experience. I'm an expert in writing Marathi content on technology and automobiles for the MarathiGold.com

For Feedback - [email protected]
Join Our WhatsApp Channel