Nothing Phone 3 स्मार्टफोन लाँचसाठी तयार व्हा, कंपनीने सांगितली तारीख आणि फीचर्सची झलक

Nothing Phone 3 लवकरच येणार! कंपनीने लॉन्च टाइमलाइन स्पष्ट केली असून स्मार्टफोनमध्ये ट्रान्सपेरंट डिझाइन, Glyph Interface आणि AI फीचर्स मिळण्याची शक्यता आहे. संपूर्ण माहिती वाचा.

On:
Follow Us

Nothing Phone 3 Launch Timeline: ट्रान्सपेरंट डिझाइनसाठी प्रसिद्ध असलेल्या Nothing ब्रँडचा नवीन स्मार्टफोन लवकरच बाजारात येणार आहे. स्वतः कंपनीचे CEO कार्ल पेई यांनी या फोनच्या लाँच टाइमलाइनची माहिती दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, Nothing Phone 3 काही महिन्यांत लाँच होणार आहे. हा 2023 मध्ये आलेल्या Nothing Phone 2 चा उत्तराधिकारी (successor) असेल.

अंदाज आहे की, यामध्ये देखील मागील मॉडेलप्रमाणे Glyph Interface आणि Transparent Rear Panel दिला जाईल. तसेच, या नव्या फोनमध्ये काही AI पावर्ड फीचर्स (AI-powered features) पाहायला मिळू शकतात.

Nothing Phone 3 लॉन्च कधी होणार?

Nothing चे CEO Carl Pei यांनी X वर एका युजरच्या प्रश्नाला उत्तर देताना 10 मिनिटांच्या Ask Me Anything (AMA) सेशनमध्ये Nothing Phone 3 च्या लॉन्चबाबत खुलासा केला. त्यांनी सांगितले की, हा स्मार्टफोन 2025 च्या तिसऱ्या तिमाहीत म्हणजे जुलै ते सप्टेंबर दरम्यान लाँच केला जाईल.

याआधी Nothing Phone 2 हा स्मार्टफोन 11 जुलै 2023 रोजी लाँच झाला होता आणि पहिल्या जनरेशनचा Nothing Phone 1 हा 21 जुलै 2022 पासून विक्रीसाठी उपलब्ध होता. काही अफवा होत्या की Nothing Phone 3 मागच्याच वर्षी येईल, परंतु यामध्ये उशीर झाला कारण पेई यांनी स्पष्ट केलं होतं की कंपनी पर्सनलाइज्ड AI वर लक्ष केंद्रीत करत होती.

Nothing Phone 2 ची खास वैशिष्ट्ये

सध्या Nothing Phone 3 चे स्पेसिफिकेशन्स समोर आलेले नाहीत. मात्र, त्याच्या आधीच्या मॉडेलविषयी बोलायचं झालं तर, Nothing Phone 2 मध्ये Snapdragon 8+ Gen 1 चिप, 12GB पर्यंत RAM आणि 512GB पर्यंत स्टोरेज मिळते. या फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.7-इंच LTPO AMOLED स्क्रीन आहे.

Nothing Phone 2 मध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा आणि 50MP अल्ट्रावाइड कॅमेरा समाविष्ट आहे. 32MP सेल्फी कॅमेरा देखील दिला आहे. यामध्ये 4700mAh बॅटरी असून, ती 47W Wired आणि 15W Wireless Charging ला सपोर्ट करते.

Mahesh Bhosale

Hey, it's me, Mahesh. I'm a Marathi content writer with over two years of experience. I'm an expert in writing Marathi content on technology and automobiles for the MarathiGold.com

For Feedback - [email protected]
Join Our WhatsApp Channel