LYNE Originals ने भारतात दोन नवीन प्रोडक्ट्स, LYNE Powerbox 16 आणि LYNE Rover 25 नेकबँड लॉन्च केले आहेत. कंपनीचा दावा आहे की हे डिव्हाइसेस जलद चार्जिंग आणि दीर्घकालीन म्युझिक प्लेबॅक यांसारख्या वैशिष्ट्यांसह येतात.
Powerbox 16 हा 10,000mAh क्षमतेचा पॉवरबँक असून तो 22.5W PD आउटपुट आणि 15W मॅग्नेटिक वायरलेस चार्जिंग सपोर्ट करतो. तर Rover 25 हा ब्लूटूथ नेकबँड आहे, जो 40 तास म्युझिक प्लेबॅक आणि 50 तास टॉकटाइम प्रदान करतो.
LYNE Powerbox 16, Rover 25 किंमत आणि उपलब्धता
LYNE Powerbox 16 ची किंमत ₹1,949 असून LYNE Rover 25 भारतात ₹899 मध्ये उपलब्ध आहे. हे दोन्ही प्रोडक्ट्स Lyneoriginals च्या अधिकृत वेबसाइट तसेच अन्य ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोअर्समध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहेत.
LYNE Powerbox 16 स्पेसिफिकेशन्स
LYNE Powerbox 16 हा 10,000mAh बॅटरी क्षमतेचा कॉम्पॅक्ट आणि पोर्टेबल पॉवरबँक आहे, जो प्रवासादरम्यान सहज वापरता येतो. यात 22.5W PD आउटपुट आणि 15W वायरलेस चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे, ज्यामुळे स्मार्टफोन आणि इतर डिव्हाइसेस जलद चार्ज करता येतात.
USB-C पोर्ट सह तो विविध चार्जिंग प्रोटोकॉल्स ला सपोर्ट करतो, त्यामुळे तो अनेक डिव्हाइसेससह सुसंगत आहे. बॅटरी लेव्हल जाणून घेण्यासाठी LED इंडिकेटर देण्यात आला आहे. हा पॉवरबँक ब्लॅक आणि ग्रीन अशा दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे.
LYNE Rover 25 स्पेसिफिकेशन्स
LYNE Rover 25 हा एक ब्लूटूथ नेकबँड आहे, जो 40 तास म्युझिक प्लेबॅक आणि 50 तास टॉकटाइम ऑफर करतो. यात Bluetooth 5.3 टेक्नोलॉजी देण्यात आली असून, ती स्थिर कनेक्टिव्हिटी आणि उत्तम बॅटरी ऑप्टिमायझेशन सुनिश्चित करते.
टच फंक्शन च्या मदतीने म्युझिक आणि कॉल सहज नियंत्रित करता येतात. तसेच, 12 मीटर पर्यंतची वायरलेस रेंज असल्याने तो फिरत असतानाही वापरण्यास सोयीस्कर ठरतो. यात Type-C चार्जिंग पोर्ट असून, ज्यामुळे तो जलद चार्ज होतो. हा नेकबँड ब्लू, ब्लॅक आणि ग्रे या तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे.