भारतीय मार्केटमध्ये Lava ने आपला नवा बजेट स्मार्टफोन Lava Yuva Star 2 लॉन्च केला आहे. कंपनीने याला मागील वर्षी सादर झालेल्या Yuva Star च्या उत्तराधिकार म्हणून आणले आहे. या स्मार्टफोनमध्ये 4GB रॅम आणि 4GB व्हर्चुअल रॅम मिळते, ज्यामुळे एकूण रॅम 8GB पर्यंत जाते. या फोनमध्ये 64GB स्टोरेज असून याची किंमत केवळ ₹6,499 ठेवण्यात आली आहे.
हा स्मार्टफोन Radiant Black आणि Sparkling Ivory या दोन रंगांमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. फोनची विक्री आता रिटेल आउटलेट्स वर सुरू झाली आहे. चला तर मग या स्मार्टफोनचे सर्व फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया.
Lava Yuva Star 2 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Lava च्या या स्मार्टफोनमध्ये 6.75-इंच HD+ LCD डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 720×1600 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 60Hz रिफ्रेश रेट सपोर्ट करतो. या डिस्प्लेवर 2.5D ग्लास संरक्षण देण्यात आले आहे. फोनमध्ये 4GB रिअल रॅम आणि 4GB व्हर्चुअल रॅम देण्यात आलेली आहे, त्यामुळे याची एकूण रॅम 8GB होते. स्टोरेजच्या बाबतीत, यात 64GB इंटरनल मेमरी असून ती microSD कार्ड च्या मदतीने 512GB पर्यंत वाढवता येते.
फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये LED फ्लॅशसह 13MP मुख्य कॅमेरा दिला आहे. यासोबतच एक AI कॅमेरा ही देण्यात आला आहे. सेल्फी कॅमेरा 5MP क्षमतेचा आहे. परफॉर्मन्ससाठी हा स्मार्टफोन Octa-Core Unisoc प्रोसेसर वर कार्यरत आहे. यामध्ये 5000mAh बॅटरी मिळते, जी 10W चार्जिंग ला सपोर्ट करते.
सिक्योरिटीसाठी फोनमध्ये Side-Mounted Fingerprint Sensor देण्यात आला आहे. हा फोन Android 14 Go Edition वर चालतो. कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये Dual 4G VoLTE, Wi-Fi 802.11 ac, Bluetooth 4.2, GPS, USB Type-C आणि 3.5mm हेडफोन जॅक यांसारखे पर्याय उपलब्ध आहेत.