7300mAh आणि 6500mAh ची बाहुबली बॅटरी, iQOO चे दोन स्मार्टफोन; किंमत आणि फीचर्स लीक

iQOO 11 एप्रिल रोजी भारतात Z10 5G आणि Z10x हे दोन शक्तिशाली बॅटरीवाले स्मार्टफोन सादर करणार असून 7300mAh आणि 6500mAh बॅटरी, दमदार प्रोसेसर आणि उत्कृष्ट कॅमेरासह येणार आहेत.

On:
Follow Us

टेक ब्रँड iQOO पुढच्या आठवड्यात दोन दमदार बॅटरी असलेले स्मार्टफोन भारतीय बाजारात सादर करणार आहे. हे दोन्ही फोन 11 एप्रिल 2025 रोजी भारतात लॉन्च होणार असून त्यांची नावे iQOO Z10 5G आणि iQOO Z10x अशी असणार आहेत. यामध्ये iQOO Z10 हा आजवरचा सर्वात मोठी 7300mAh बॅटरी असलेला स्मार्टफोन असेल.

विशेष म्हणजे, इतकी मोठी बॅटरी असतानाही हा फोन केवळ 7.89mm जाडीचा असून तो आतापर्यंतचा सर्वात सडपातळ जंबो-बॅटरी स्मार्टफोन असेल. दुसरीकडे, iQOO Z10x मध्ये 6500mAh बॅटरी मिळणार आहे. चला तर मग, लॉन्चपूर्वी iQOO Z10 5G आणि Z10x च्या किंमती (Price) आणि फीचर्स (Features) जाणून घेऊया.

iQOO Z10 आणि Z10x ची किंमत (Leak)

Smartprix च्या लीक रिपोर्टनुसार, iQOO Z10 स्मार्टफोन 128GB आणि 256GB स्टोरेज पर्यायात सादर होईल. याच्या बेस व्हेरिएंटची किंमत ₹21,999 असेल, मात्र बँक ऑफरच्या माध्यमातून हा फोन लॉन्चवेळी ₹19,999 मध्ये मिळू शकेल. दुसरीकडे, iQOO Z10x च्या किमतीविषयी अद्याप अधिकृत माहिती नाही. मात्र हा फोन iQOO च्या मागील मॉडेल Z9x प्रमाणेच सुमारे ₹12,999 मध्ये येण्याची शक्यता आहे.

iQOO Z10 चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

iQOO ने यासंदर्भात पुष्टी केली आहे की Z10 स्मार्टफोन दोन आकर्षक रंगांत सादर होईल – Stellar Black ज्यात स्लीक मॅट फिनिश असेल आणि Glacier Silver हा दुसरा पर्याय असेल. जरी या डिव्हाईस मध्ये 7300mAh बॅटरी असेल, तरी देखील त्याची जाडी फक्त 7.89mm आहे. या फोनमध्ये 90W FlashCharge सपोर्ट असेल, ज्यामुळे हा फोन केवळ 33 मिनिटांत 50% पर्यंत चार्ज होऊ शकतो, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

प्रोसेसरच्या बाबतीत, iQOO Z10 मध्ये Qualcomm चा Snapdragon 7s Gen 3 प्रोसेसर दिला जाईल. कॅमेराबाबत सांगायचे झाल्यास, या स्मार्टफोनमध्ये 50MP फ्रंट कॅमेरा आणि 32MP सेल्फी कॅमेरा मिळणार असून याबाबत कंपनीने स्वतः X (Twitter) हँडलवरून माहिती दिली आहे.

iQOO Z10x चे फीचर्स

iQOO Z10x 5G फोनमध्ये MediaTek च्या 4nm फॅब्रिकेशनवर बनवलेला Dimensity 7300 Octa-core प्रोसेसर मिळेल. कंपनीच्या म्हणण्यानुसार, हा स्मार्टफोन त्याच्या सेगमेंटमधील सर्वात वेगवान फोन असेल, ज्याचा AnTuTu बेंचमार्क स्कोअर 7.2 लाखांहून अधिक आहे. यामध्ये 6500mAh बॅटरी दिली जाईल, त्यामुळे बॅटरी बॅकअपची चिंता करण्याची गरज नाही.

कॅमेराच्या बाबतीत, फोनमध्ये रेक्टँग्युलर कॅमेरा मॉड्यूल दिला जाईल ज्यात 2 कॅमेरा सेन्सर्स असतील. याशिवाय, रिंग लाइट आणि LED फ्लॅश लाइट सुद्धा मागील बाजूस असणार आहे.

Mahesh Bhosale

Hey, it's me, Mahesh. I'm a Marathi content writer with over two years of experience. I'm an expert in writing Marathi content on technology and automobiles for the MarathiGold.com

For Feedback - [email protected]
Join Our WhatsApp Channel