iQOO लवकरच आपला नवीन स्मार्टफोन बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. आपण बोलतोय iQOO Neo 10 Pro+ या आगामी फ्लॅगशिप फोनबद्दल. या फोनसंबंधी काही खास माहिती ऑनलाइन समोर आली आहे. एका टिप्स्टरने Weibo पोस्टद्वारे iQOO च्या या नवीन डिव्हाइसबाबत माहिती शेअर केली होती.
पोस्टमध्ये फोनच्या डिस्प्ले (Display), कॅमेरा (Camera) आणि चिपसेट (Chipset) बाबत महत्त्वाचे तपशील देण्यात आले होते. मात्र, ही पोस्ट नंतर हटवण्यात आली आहे.
iQOO Neo 10 Pro+ चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
लीक झालेल्या माहितीनुसार, iQOO Neo 10 Pro+ मध्ये Snapdragon 8 Elite चिपसेट असणार आहे. V2463A हा मॉडेल नंबर असलेला हा फोन Geekbench वर आधीच या चिपसेटसह दिसून आला आहे. याला चीनमध्ये 3C सर्टिफिकेशन मिळाले असून त्यामुळे हा फोन 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल, अशी माहिती समोर आली आहे.
याआधीच्या रिपोर्ट्समध्ये या फोनला iQOO Neo 10S, Neo 10S Pro/Pro+ अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखले जात होते. मात्र, सध्याच्या लीकमध्ये नमूद केलेले iQOO Neo 10 Pro+ हेच त्याचे अंतिम नाव असेल की नाही, हे अजून स्पष्ट व्हायचं आहे.
लीकनुसार, या डिव्हाइसमध्ये 6.82-इंच 2K फ्लॅट OLED स्क्रीन, 120W फास्ट चार्जिंगसह मोठी बॅटरी (संभाव्यतः 7000mAh पेक्षा जास्त) आणि Snapdragon 8 Elite प्रोसेसर असण्याची शक्यता आहे. तसेच, यामध्ये ड्युअल-चिप प्लॅटफॉर्म दिला जाईल, ज्यामध्ये एक डेडिकेटेड डिस्प्ले चिप समाविष्ट असू शकते.
याशिवाय, लीकमध्ये असेही म्हटले आहे की या फोनमध्ये 16-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा असेल. मागील बाजूस 50-मेगापिक्सेल मुख्य कॅमेरा आणि 8-मेगापिक्सेल सेकंडरी लेंस (बहुधा अल्ट्रावाइड) दिला जाईल. यापूर्वी Geekbench लिस्टिंगद्वारे यामध्ये 12GB RAM आणि Android 15 ऑपरेटिंग सिस्टम असल्याचेही स्पष्ट झाले आहे.