Infinix Note 50x भारतात लाँच होण्यास सज्ज: Infinix ने नुकतेच इंडोनेशियामध्ये आपली ‘Note 50’ मालिका सादर करत Infinix Note 50 आणि Note 50 Pro हे दोन 4G स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. ग्लोबल मार्केटमध्ये हे फोन सादर केल्यानंतर आता कंपनी नवीन Infinix Note 50x भारतात आणत आहे. कंपनीने अधिकृतरित्या घोषणा केली आहे की, Infinix Note 50x भारतात 27 मार्च रोजी लॉन्च होईल.
Infinix Note 50x भारतात कधी लाँच होणार?
Infinix कंपनी याच महिन्यात भारतात Note 50 मालिका लॉन्च करणार आहे. अधिकृत माहितीनुसार, या मालिकेतील पहिला स्मार्टफोन 27 मार्च रोजी भारतात लॉन्च होणार आहे. विशेष म्हणजे, हा फोन जगात सर्वप्रथम भारतात उपलब्ध होणार आहे. मात्र, या फोनची किंमत आणि विक्रीसंबंधी माहिती 27 मार्चला समोर येईल. उपलब्ध माहितीनुसार, हा स्मार्टफोन Flipkart वर विक्रीसाठी उपलब्ध होईल.
Infinix Note 50x चा डिझाइन कसा असेल?
कंपनीच्या म्हणण्यानुसार, Infinix Note 50x हा भारताचा पहिला Octagonal ‘Gem-Cut’ Camera मॉड्यूल असलेला स्मार्टफोन असेल. याच प्रकारचा डिझाइन Infinix Note 50 आणि Note 50 Pro मध्येही पाहायला मिळाला होता.
या फोनमध्ये Triple Rear Camera Setup दिला जाणार असून त्यासोबत Active Halo Lighting देखील असेल. ही LED लाइट नोटिफिकेशन, सेल्फी टायमर, चार्जिंग स्टेटस आणि गेम बूट-अपदरम्यान प्रकाशित होईल.
Infinix Note 50 Pro चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
➡ डिस्प्ले (Display) : Infinix Note 50 Pro मध्ये 6.78-इंचाचा Full HD+ AMOLED डिस्प्ले आहे, जो 144Hz रिफ्रेश रेट, 2160Hz डिमिंग, आणि 1300nits पिक ब्राइटनेस सपोर्ट करतो. तसेच, हा डिस्प्ले Under-Screen Fingerprint Sensor टेक्नोलॉजीसह येतो.
➡ कॅमेरा (Camera) : फोटोग्राफीसाठी यात Triple Rear Camera Setup देण्यात आला आहे. यात 50MP Samsung GN5 OIS सेन्सर (f/1.88 अपर्चर), 8MP Ultra-Wide Lens, आणि Third Flicker Sensor आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32MP Front Camera दिला आहे.
➡ परफॉर्मन्स (Performance) : हा स्मार्टफोन Android 15 आधारित XOS 15 वर कार्य करतो. यात 6nm फॅब्रिकेशनवर आधारित MediaTek Helio G100 Ultimate ऑक्टा-कोर प्रोसेसर दिला आहे, जो 2.2GHz क्लॉक स्पीड वर चालतो. याशिवाय, Mali-G57 GPU ग्राफिक्ससाठी दिला आहे.
➡ बॅटरी (Battery) : हा स्मार्टफोन 5,200mAh Battery सपोर्ट करतो. यात Cheetah X2 Power Management Chip आहे. बॅटरी 90W फास्ट वायर्ड चार्जिंग, 30W वायरलेस MagCharge, आणि 10W Reverse चार्जिंग टेक्नोलॉजीला सपोर्ट करते.